आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी एअरलाईन्स लवकरच सुरू करणार भारतातील या मार्गावर सेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लो कॉस्ट एअरलाईन्स कंपनी व्हिएतजेट लवकरच देशात आपला व्यवसाय सुरु करणार आहे. ही एअरलाईन्स लवकरच नवी दिल्लीपासून हो ची मिन्ह सिटीसाठी थेट सेवा सुरु करणार आहे. व्हिएतनाममध्ये बिकिनी एअरलाईन्सच्या नावाने व्हिएतजेट प्रसिद्ध आहे.

 


या एअरलाईन्सची खास बाब म्हणजे या विमानातील एअरहोस्टेस बिकिनीमध्ये असतात. या एअरलाईन्सची सेवा आठवड्यातून चार वेळा असेल. जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत ही कंपनी भारतात आपला व्यवसाय सुरु करण्याची शक्यता आहे. व्हिएतजेटमध्ये हवाई सुंदरींच्या बिकिनी ड्रेसवर अनेक वेळा वादही झाला होता. पण या वादाला, विरोधाला न जुमानत व्हिएतजेट एअरची सीईओ फुओंग थाओ यांनी कंपनीची वेगळी ओळख निर्माण केली. एअरलाईन्सच्या यशाचा परिणाम म्हणजे कंपनीची सीईओ फुओंग थाओ या व्हिएतनामच्या पहिल्या महिला अब्जाधीश आहेत. मात्र भारतात या एअरलाईन्सला कसा प्रतिसाद मिळतो आणि येथेही एअरहोस्टेस बिकिनीमध्ये दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. सोशल मीडियावर आतापासूनच याची चर्चा सुरु असून अनेक जण याची वाट पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...