आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू: एआयडीएमकेच्या नेत्या शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नटराजन मागील काही महिन्यांपासून विविध अवयव निकामी झाल्याने आजारी होते. - Divya Marathi
नटराजन मागील काही महिन्यांपासून विविध अवयव निकामी झाल्याने आजारी होते.

चेन्नई- उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी सध्या तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या तामिळनाडूतील एआयडीएमकेच्या नेत्या व्ही के शशिकला यांचे पती एम. नटराजन (वय 74) यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. लिव्हर आणि किडनीसह नटराजन यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला.

 

नटराजन यांना छातीत दुखत असल्याने शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची स्थिती इतकी बिघडली की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर सोमवारी रात्री 1.35 मिनिटांनी मरूथप्पा नटराजन यांचा मृत्यू झाल्याचे रूग्णालयाने जाहीर केले. नटराजन यांच्यावर ऑक्टोबर 2017 मध्ये चेन्नईतील एका हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट झाले होते.

 

नटराजन यांच्यावर त्यांच्या थनजवुर या जिल्ह्यातील मूळगावी आज सायंकाळी करण्यात येतील. बंगळुरूमध्ये तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या शशिकला यांना तत्काळ पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो.

 

कोण होते नटराजन?

 

- नटराजन एक तमिळ सामाजिक कार्यकर्ता होते. ते एक तमिळ मॅगझीन पुथिया पारवई चालवायचे.
- याशिवाय नटराजन राज्याचे पब्लिक रिलेशन ऑफिसर राहिले आहेत.
- 2011 मध्ये तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी शशिकलासह तिच्या कुटुंबियांना पक्षातून हाकलून दिले होते. मात्र, नंतर जयललिता यांनी जवळचे संबंध राहिल्याने शशिकलाला पक्षात घेतले होते.