आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू, ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. पण सुरुवातीच्या काही तासांत मतदानाला फारशी गर्दी झाली नसल्याचे पाहायला मिळाले. पालघरमध्ये पहिल्या दोन तासांत 7 टक्के तर भंडारा गोंदियामध्ये पहिल्या दोन तासांत 5 टक्के मतदान झाल्याचे समोर   आले. दरम्यान, दोन्ही ठिकाणी काही बूथवरील ईव्हीएम बंद असल्याने लोकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. 

 

शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावीत तर  शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा हे मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे दामोदर शिंगडा, माकपचे गहला हेही स्पर्धेत आहेत, पण प्रमुख लढत गावीत आणि वनगा यांच्यात असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी लागणार आहे. 


वेळ वाढवण्याची मागणी 
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मात्र काही भागांमध्ये ज्याठिकाणी नक्षलींचा प्रभाव आहे, अशा ठिकाणी मतदान दुपारी तीनपर्यंतच असणार आहे. दरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा संताप झाल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची वेळ कमी झाल्याने जेवढा वेळ ईव्हीएम बंद होते, तेवढा वेळ मतदानासाठी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 

पुढे पाहा, PHOTOS

बातम्या आणखी आहेत...