आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील ओशो आश्रमात आले होते इरफान, घेतली होती या थेरिपीची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरफान हे पूर्ण एक दिवस पुण्यातील ओशो आश्रमात होते. - Divya Marathi
इरफान हे पूर्ण एक दिवस पुण्यातील ओशो आश्रमात होते.

मुंबई- अभिनेते इरफान खान यांच्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात येत होते. ही बाब रुग्णालयाने नाकारली आहे. तर चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीही त्यांच्या आजारपणाचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. इरफान हे सुध्दा विनोद खन्ना यांच्याप्रमाणेच ओशो यांची विचारधारा मानणाऱ्यापैकी एक असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ते पुण्यातील ओशो आश्रमात आले होते.

 

 

ओशोंच्या ध्यानपध्दतीची घेतली होती माहिती
- ओशो टाईम्सच्या संपादिका माँ अमृत साधना यांनी सांगितले की ते एक दिवस ओशो गेस्ट हाऊस मध्ये राहण्यास होते.
- इरफान यांनी ओशोंच्या साहित्याचे वाचन गेले आहे. त्यावेळी त्यांनी आपण ओशोच्या विचारधारेच्या प्रेमात असल्याचे सांगितले होते.

- त्यांनी ओशोंच्या ध्यानपध्दतीविषयी माहिती घेतली. 
- त्यानंतर त्यांनी बुध्दाच्या मुर्तीजवळ बसून ध्यानधारणा केली. त्यांनी हे स्थान एखाद्या चुंबकासारखे काम करत असल्याचे मत व्यक्त केले.

 

 

काय आहे ओशो मेडिटेशन थेरिपी?
- माँ अमृत साधना यांनी सांगितले की ओशोंच्या 4 ध्यानपध्दती आहेत. त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहेत. याच्या मदतीने व्यक्ती आंतरिकरित्या उत्तम होते. 

 

1- ओशो नो माइंड- सात दिवसांच्या या पध्दतीत एक तास वेगवेगळे आवाज काढून मनावरील तनाव दुर करण्यात येतो. तर नंतरच्या एका तासात मौनात राहावे लागते.
2- ओशो बॉर्न अगेन- सात दिवसाच्या या पध्दतीत तुमचे हरवलेला निरागसतेचा आनंद परत मिळावा असा प्रयत्न करण्यात येतो. या वेळेत एक तास तुम्ही लहान असल्यासारखे वागता. त्यानंतर शांतपणे एक तास बसता. 
3- ओशो मिस्टिक रोज- तीन आठवड्यांच्या या थेरपीत पहिल्या आठवड्यात तीन तास हसणे, दुसऱ्या आठवड्यात तीन तास रडणए आणि तिसऱ्या आठवड्यात तीन तास मौन धारण करावे लागते.
4- ओशो रिमायडिंग युअरसेल्फ ऑफ टॉकिंग टु युअर बॉडी अॅण्ड माईंड- सात दिवस रोज एक तास आपल्या शरिराशी आणि मनाशी संवाद साधत. त्याला तणावमुक्त करुन उत्तम मनस्वास्थ प्राप्त करणे

 

 

पुण्याहून परतल्यावर इरफानने पाठवले पत्र
- मेडिटेशन रिसॉर्टमध्ये राहिल्यानंतर इरफानने आपल्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केल्या. मी ओशोंच्या ऊर्जा क्षेत्रात पहिल्यांदाच राहिलो. तिथे राहिल्यानंतर मला असे वाटले की मी पहिल्यांदाच मुंबईत आलो आहे आणि समुद्र पाहिला आहे. हा अनुभव मला स्वत:विषयी काहीतरी सांगणारा होता.
- ओशोंचे हे केंद्र एक प्रयोगशाळा आहे. तिथे तुम्ही स्वत:सोबत आपल्या बाह्य आणि अंतरंगासोबत प्रयोग करता. तुम्ही तुमच्या मनावरील धुळ झटकता आणि स्वच्छ होऊन बाहेर पडता. ही एक कसदार जमीन आहे जिथे बीज लावून तुम्ही ते अंकुरित होण्याची प्रतिक्षा करु शकता.

 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...