आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन: आवड, कलागुण जपले तर ताण कमी; अमृता फडणवीस यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आपली आवड आणि कलागुण जपले तर आपल्या मन आणि शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. आजच्या महिला घर आणि नोकरी यांची जबाबदारी समर्थपणे पार पाडतात. पण असे करत असताना स्वतःच्या आवडी निवडी विसरुन जातात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

 


जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाअंतर्गत दुर्गा महिला मंचाच्यावतीने गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमृता फडणवीस या उपस्थित होत्या. महिलांनी आपली आवड आणि कलागूण जपले तर मनावरील आणि शरीरावरील ताण कमी होतो. आपण हाती घेतलेले जे काम आहे त्यात शंभर टक्के प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

राज्य महिला आयोगातर्फे महिलांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन 
या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या देखील उपस्थित होत्या. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सॅनिटरी वेन्डिंग मशीन आणि शाळांमध्ये आरोग्य रक्षक पेढीसाठी महिला आयोगातर्फे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगातर्फे महिलांच्या समुपदेशनासाठी सुहिता ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली. सुहिता हेल्पलाईनचा नंबर 747772242 असा असून ही हेल्पलाईन कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...