आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीमुळे नुकसान; शिवसेनाप्रेमी व्यापाऱ्याची कराडमध्ये आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल फाळके..... - Divya Marathi
राहुल फाळके.....

कराड- नोटबंदी व जीएसटीमुळे मोठे नुकसान झाल्याने कराडमधील एका युवा सराफा व्यापाऱ्याने शुक्रवारी दुपारी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. राहुल फाळके असे या व्यापाराचे नाव असून त्याने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहेे.   
राहुलचे कराडमध्ये मंगलमूर्ती ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान होते. नोटबंदीनंतर त्याचा व्यवसाय अडचणीत आला होता. तसेच त्यानंतर लागू केलेल्या जीएसटीमुळेही धंदा बसला. त्यामुळे धंद्यात मोठे नुकसान झाल्याने आपण इच्छा नसतानाही आत्महत्येसारखे पाऊल उचलत असल्याचे राहुलने आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.  


शिवसेनेचा आदराने उल्लेख : बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार एक शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो. पण, आज काही चूक नसताना मान खाली घालून मी जगू शकत नाही. यापुढे कृपा करून शिवसेनेला निवडून द्या. कारण, फक्त थापा मारणारे आणि भाषणबाजी करणारे खूप नेते आहेत. पण, उद्धव ठाकरे यांना मन आहे. ते उत्कृष्ट वक्ता नसतील पण जनतेच्या वेदना त्यांना नक्की समजतात आणि जेव्हा महाराष्ट्रावर भगवा फडकेल तीच मला खरी श्रद्धांजली असेल, असेही राहुल फाळकेने पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राहुल फाळकेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली फेसबुक पोस्ट जशीच्या तशी.....

बातम्या आणखी आहेत...