आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी वाचणार नाही, माझा एटीएम पिन क्रमांक लिहून घे... तरूणाने मृत्युपूर्वी केला भावाला फोन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'मी आगीत अडकलोय. मी वाचणार नाही. माझा ATM पिन क्रमांक लिहून घे, बँकेच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घे आणि माझ्या कुटुंबाला दे' हे शब्द आहेत गोरेगाव येथील आगीत होरपळून मृत्यू झालेल्या 23 वर्षीय तरूण अब्दुल राकीबचे. रविवारी संध्याकाळी गोरेगाव पश्चिम येथिल स्वामी विवेकानंद मार्गावरील ‘टेक्निक प्लस’ या ९ मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात अब्दुल राकीब यानेही आपला जीव गमावला आहे.


मृत्यूपूर्वी अब्दुलने जे केले ते सर्वांसाठी भावनिक धक्का देणारे होते. अब्दुलच्या शेवटच्या फोनमधून त्याचे कुटुंबावर असलेले प्रेम आणि काळजी दिसून आली. एकादा व्यक्ती मरेपर्यंत आपल्या कुटुंबाचा कसा विचार करतो याचे उदारहण अब्दूलने दाखवून दिले आहे. साकी नाका येथे राहणाऱ्या अब्दुल राकीबचा मृतदेह सातव्या मजल्यावरील इलेक्ट्रिक रूममध्ये सापडला. मुंबई मिररने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.


‘टेक्निक प्लस’मध्ये लागलेल्या आगीच्या कचाट्यात सापडून अब्दुल राकीब मृत्यू झाला. त्याचे वय अवघे फक्त 23 वर्ष होते. परंतु, कुटुंबाच्या काळजाने मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी अब्दुलने भाऊ तौफीलला फोन करून एटीएमचा पिन देण्याचा प्रयत्न केला. मृत्यूनंतर कुटुंबाला एटीएममधून पैसे काढता यावे, यासाठी अब्दुलने भावाला फोन केला. दोघांमध्ये हे संभाषण सुरू असताना मोठा भाऊ तौफीलने त्याला खचून न जाण्याचं सागितलं. 'मी एटीएम पिन घेणार नाही. तू स्वतःला वाचविण्याचा रस्ता शोध. तेथे खिडकी असेल तर उडी मारण्याचा प्रयत्न करं, असं अब्दुलला म्हणाल्याचे तौफीलने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...