आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराज व अफझल खान भेटीचे 10 Unknown Facts, घ्या जाणून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 388 वी जयंती राज्यासह देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान भेटीचे 10 प्रमुख फॅक्ट्सबाबत माहिती देणार आहोत. शिवाजींना पकडण्यासाठी आदिलशहाच्या पत्नीने अफझल खानवर सोपविली होती जबाबदारी....

 

- शिवाजी महाराजांना मृत अथवा जिवंत पकडून आणण्यासाठी मुहंमद आदिलशहाची विधवा पत्नी बडीबेगसाहिबा हिने अफझल खानाची या मोहिमेवर नियुक्ती केली होती.
- आदिलशाही सेनापती खान महंमदला संपवल्यानंतर अफझल खान आदिलशाहीचा सेनापती झाला होता. तो स्वामिनिष्ठ, कर्तबगार आणि पराक्रम सरदार होता. कर्नाटकात पराक्रम गाजवून त्याने एकदा शहाजादा औरंगजेबालाही कोंडीत पकडले होते. 
- अनेक सुरमा त्याच्या नुसत्या नावाने गर्भगळीत व्हायचे. शिवाजी महाराजांवर चाल करुन येताना एकदा एक तोफ जमिनीत रुतून बसली होती. आठ सैनिकांनी तोफ काढण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही.
- खानाने केवळ एक हाताने ती जमिनीतून बाहेर काढली होती. यावरुन त्याच्या शक्तीचा अंदाज येतो.
- अफजल खानासोबत बडीबेगसाहिबा हिने 12 हजार घोडदळ आणि 10 हजार पायदळ लष्कर दिले होते. 
- शिवाय हत्ती, घोडे, उंट, बैल, तोफखाना, प्रचंड दारुगोळा आणि खनिजा दिला होता. पश्चिम महाराष्ट्रात आल्यावर त्याला अनेक सरदार येऊन मिळाले. 
- त्यामुळे त्याचे सैन्य वाईजवळ आले तेव्हा तब्बल 30 हजारांच्या घरात पोहोचले होते.

 

अफझल खानाच्या हत्येवरून वेगवेगळी मतांतरे-

 

- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा खातमा केला. त्याच्यासोबत आलेले सैन्य बुडवले. 
- या संपूर्ण प्रकरणावर मराठी, फारशी आणि परकीय साधनांमध्ये वेगवेगळी भूमिका मांडण्यात आली आहे.
- मराठी साधनांमध्ये अफझल खानाने विश्वासघात करुन पहिला वार केला, असे सांगण्यात आले आहे. पण फारशी आणि परकीय साधनांमध्ये शिवाजी महाराजांवर आरोप करण्यात आला आहे. 
- फारशी साधने आदिलशाहाचे समर्थन करणारच हे उघड सत्य आहे. पण डच आणि इंग्रजी पत्रांमध्ये मराठी साधनांची पुष्टी करणारी भूमिका दिसून येते. 
- यात शिवाजी महाराजांना शस्त्रांच्या जोरावर किंवा गोड बोलून संपवण्याचा आदेश बडीबेगसाहिबाने अफझल खानाला दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान भेटीचे 10 प्रमुख फॅक्ट्स... जाणून घ्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडी....

 

साभार- मराठ्यांचा इतिहास, लेखक- प्रा. मदन मार्डीकर

बातम्या आणखी आहेत...