आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बॉम्बस्फोटांची २५ वर्षे:\'पुनर्जन्मानंतरचा 25वा वाढदिवस\' पीडित अजमेरांनी जागवल्या आठवणी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इतर अनेक पीडितांप्रमाणेच १२ मार्च १९९३ हा दिवस शेअर बाजारात ब्रोकर म्हणून काम करणारे कीर्ती अजमेरा कधीच विसरू शकणार नाहीत. त्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास दक्षिण मुंबईतील शेअर बाजाराच्या इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटाने त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त केले. ‘आज माझ्या पुनर्जन्मानंतरचा पंचविसावा वाढदिवस अाहे. आणि तो मी आनंदाने साजरा करतो आहे,’ अशा खिलाडूवृत्तीने आपल्यावरील संकटाचा ‘वाढदिवस’ कीर्ती अजमेरा यांनी रविवारी आपल्या कुटुंबीयांसमवेत साजरा केला. मालाड येथील आपल्या निवासस्थानी पत्नी व मुलांसह केक कापताना त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. 


‘माझ्या अायुष्यातील तब्बल २५ वर्षे या दुर्घटनेमुळे वाया गेली. शारीरिक आणि मानसिक यातना काय झाल्या हे मी सांगूही शकणार नाही. माझ्या दोन मुलांचे बालपण या सर्व घटनाक्रमात अक्षरश: होरपळून गेले. आतापर्यंत माझ्या शरीरावर चाळीसपेक्षा अधिक छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी जवळपास तीस ते चाळीस लाखांचा खर्च मी सोसला आहे. मात्र अजूनही माझे आयुष्य पुर्ववत झालेले नाही,’ कीर्ती अजमेरा सांगत होते.

 

‘सरकारकडून आता आपली काय अपेक्षा आहे,’ असे विचारले असता अजमेरा म्हणाले की, ‘नुकसान भरपाई मिळावी म्हणून आजही माझा संघर्ष सुरू आहे. इतर पिडितांनी सुरूवातीला माझ्यासह न्यायासाठी लढा दिला, पुढे त्यांनी प्रयत्न सोडले. माझा लढा मात्र अजूनही सुरू आहे, पण आता वयामुळे सरकारशी लढण्याची उमेदही संपत चालली आहे. सरकारकडून मी काही भिक मागत नाही, नुकसान भरपाई मिळणे हा माझा हक्कच आहे. त्यामुळे माझ्या नुकसान भरपाईची अपेक्षा तर सरकारकडून आहेच, त्याच बरोबर अशा प्रकारचे जे पिडित आहेत, जे न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांच्या मदतीसाठी एक कायम स्वरूपी यंत्रणा उभी करावी किंवा एखादी समिती नेमली जावी, यासाठी मी पाठपुरावा करत अाहे. जेणेकरून मी जे सोसले आहे तसा संघर्ष भविष्यात कुणाच्याही वाट्याला येऊ नये’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.  

 

दाेन तासांत १२ धमाके, २५७ ठार: १२ मार्च १९९३  

- दु १.३० वा: मुंबई शेअर मार्केट इमारतीच्या तळमजल्यावर स्फाेट, ८४ ठार, तर २१७ जखमी
- दु. २.१५ वा:  नरसी नाथा स्ट्रीट, काथा बाजार, ४ ठार, १६ जखमी
- दु. २.२५ वा: सेंच्युरी बाजार, वरळी. ११३ ठार, २२७ जखमी  
- दु २.३० वा:  पेट्रोल पंप, शिवसेना भवन दादर 
- दु. २.३३ वा: एअर इंडिया इमारत, नरिमन पॉइंट, २० ठार, ८७ जखमी  
- दु. २.४५ वा:  मच्छीमार वसाहत, माहिम. ३ ठार, ६ जखमी  
- दु. ३.०५ वा:  जव्हेरी बाजार. १७ ठार, ५७ जखमी  
- दु. ३.१० वा: हॉटेल सेना रॉक, बांद्रा  
- दु. ३.१३ वा : प्लाझा सिनेमा, दादर. १० ठार, ३७ जखमी  
- दु. ३.२० वा: हॉटेल जुहू सेंटर, ३ जखमी  
- दु. ३.३० वा:  सहारा विमानतळाजवळ, सांताक्रुझ  
- दु्. ३.४० वा. : हॉटेल एअरपोर्ट सेंटाॅर, २ ठार, ८ जखमी.  

 

अजूनही जपून ठेवल्यात शरीरात घुसलेल्या काचा  
या बॉम्बस्फोटाने अजमेरांचे आयुष्यच बदलून गेले. शारीरिक आणि मानसिक पातळीवर त्यांना प्रचंड त्रास झाला. शिवाय वैद्यकीय उपचारामुळे आर्थिक विवंचनाही वाट्याला आली. मात्र तरीही त्याबाबतचे दु:ख न मानता अजमेरा आल्या आव्हानाला सामोरे जातात. या बॉम्बस्फोटाची आठवण म्हणून त्यांच्या शरीरात घुसलेल्या काचांचे तुकडे त्यांनी आजही जपून ठेवले आहेत.

 

> १९९३ च्या बाॅम्बस्फाेटाच्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

- मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे : स्फाेटात उद‌्ध्वस्त व्हॅनच ठरली तपासाचा दुवा
- मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे: पाकचा बुरखा फाडू न शकल्याचे अाजही शल्य : अॅड. निकम
- दाऊद दूरच, इतरांना शिक्षा करणेही कठीण; तपास अधिकारी सुरेश वालीशेट्टी यांचे मत
- मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे:...आणि क्षणात परिसर गोठल्यासारखा झाला- प्रकाश पार्सेकर
- मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे: संजय दत्तही खलनायक

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, बॉम्बस्फोटा नंतरची छायाचीत्रे...

बातम्या आणखी आहेत...