आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीचा 3 लाख हेक्टरला फटका; 19 जिल्ह्यांतील 3724 गावांचा समावेश: कृषिमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १९ जिल्ह्यांतील सुमारे १०२ तालुक्यांमधील ३७२४ गावांमधील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. यात गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळपिकांचे नुकसान झाले, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. या जिल्ह्याच्या ५१० गावांमधील सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ बुलडाण्याच्या ३३० गावांतील ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील ३३२ हजार हेक्टरचा समावेश आहे.   


बाधित जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.  नुकसानीची जिल्हा, तालुका, गावनिहाय माहिती अशी (कंसात बाधित हेक्टर): बीड- माजलगाव, गेवराई, शिरूर- ४२  गावे (१०,६३२ हे.), जालना- जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड- १७५ गावे (३२ हजार हे.), परभणी- सेलू व जिंतूर- २३ गावे  (८५८९ हे.),  लातूर - लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा, शि.अनंतपाळ- ३०८ गावे (१६,३६१ हे.) उस्मानाबाद- उमरगा व उस्मानाबाद- १२२ गावे (३०,११२ हे.).

 

पंचनामेच पूर्ण नसल्याने मदतीची प्रतीक्षा 
शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे अादेश कृषिमंत्र्यांनी दिले हाेते, मात्र अाठवडा उलटला तरी अजूनही अनेक भागातील पंचनामे झालेले नाहीत. ते पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीक विमाधारकांना विमा कंपनीकडून नुकसानीची भरपाई मिळणार अाहे, मात्र ज्यांनी विमा काढलेला नाही अशांची मदत एनडीअारएफच्या मंजुरीवरच अवलंबून अाहे. 

बातम्या आणखी आहेत...