आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी प्रकरण: मुकेश अंबानींचा चुलत भाऊ विपुल अंबानीसह 5 अधिकारी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पीएनबीला ११,३९४ कोटी रुपयांना फसवल्याच्या प्रकरणात सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरा नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनल कंपनीचा मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) विपुल अंबानीसह ५ जणांना अटक केली. विपुल हा रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा चुलत भाऊ आहे. 


तो तीन वर्षांपासून नीरवच्या कंपनीत अाहे. यासह नीरवच्या तीन कंपन्यांच्या अॉथोराइज्ड सिग्नेटरी कविता माणिकर, फायरस्टार ग्रुपचे सीनियर एक्झिक्युटिव्ह अर्जुन पाटील, नक्षत्र समूहाचे सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजलीचे मॅनेजर नितेन शाही यांनाही अटक झाली आहे. सीबीआयने आतापर्यंत एकूण ११ जणांना अटक केली आहे. यात ४ पीएनबीचे अधिकारी, एका निवृत्त डीजीएमचा समावेश आहे. सहा जण नीरव-मेहुलच्या कंपन्यांतील आहेत.

बातम्या आणखी आहेत...