आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- यंदा नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप पुण्यात 23 ते 25 मार्च दरम्यान आयोजित केली जात आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला मुंबईतील 51 वर्षीय बॉडी बिल्डर निशरीन पारीख हिच्याबाबत सांगणार आहोत. निशरीन एक हाऊस वाईफ आहे आणि काही दिवसापूर्वी तिने प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग सुरू केली आहे. तिला देशातील सर्वात वयस्कर महिला बॉडी बिल्डर मानले जाते. निशरीनने मागील काही वर्षापासून धान्याचा एक दाणाही खाल्ला नाही. अशी आली बॉडी बिल्डिंगची आयडिया...
- काही वर्षापूर्वी शरीरात होणा-या हार्मोनल बदलामुळे वाढत्या वयासोबत निशरीनचे वजन एका वर्षात 15 किलोपेक्षा जास्त वाढले होते.
- नेहमीच फिटनेसबाबत सजक राहिलेल्या निशरीनला जाडपणा मंजूर नव्हता. तिने आपल्या फिटनेसवर काम सुरू केले.
- तिने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योग आणि वेट ट्रेनिंग एकत्र सुरू केले. ती दिवसातून फक्त पाच तास झोपायची तर पाच तास योगा आणि वेटलिफ्टिंगचे ट्रेनिंग घेते.
- अशा प्रकारे 51 वर्षाच्या निशरीनने वजनावर तर मत केलीच पण शानदार बॉडी बनविली.
- मुंबईतील बोहरा मुस्लिम परिवारात जन्मलेली निशरीनने एका गुजराती जैन डायमंड मर्चंटसोबत लग्न केले आहे. मानसशास्त्रात पदवी घेतलेली निशरीन एक योगा टीचर आणि फिटनेस एक्सपर्ट सुद्धा आहे.
अनेक स्पर्धात झाली सहभागी-
- निशरीन मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या एशियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वात वयस्कर महिला बॉडी बिल्डर म्हणू सहभागी झाली होती.
- निशरीन पारीख कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट होल्डर आहे.
- तिने बिकनी एथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला आहे. जेथे तिला सुपर वुमन खिताब दिला गेला.
अनेक वर्षापासून धान्यांचा एकही दाणा खाल्ला नाही-
- निशरीनच्या आरोग्यात महत्त्वाचा भाग राहिला आहे तिचा आहार. निशरीनने मागील अनेक वर्षापासून धान्यांचा एक दाणाही खाल्लेला नाही.
- तिचे म्हणणे आहे की, धान्याच्या प्रत्येक दाण्यातून ऊर्जा मिळते. त्यामुळे त्याचा वापर जर योग्यरित्या केला नाही तर फॅटमध्ये कन्वर्ट होतो.
- निशरीनला मागील अनेक वर्षापासून डॉक्टरकडे जावे लागले नाही. निशरीन स्वत:ला बॉडी बिल्डर्सची रोल मॉडेल असल्याचे सांगते. ती जेथे कुठे जाते तेथे लोक तिला तिच्या फिटनेसचे राज विचारतात व महिला फिटनेस टिप्स घेतात.
- निशरीन प्रत्येक त्या महिलेसाठी रोल मॉडेल आहे ज्यांचे वाढत्या वयाबरोबर वाढणारे वजन, थकवा आणि लठ्ठपणाने त्रस्त आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.