आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंचा आज 27 वा वाढदिवस, वाचा युथ आयकॉन असलेल्या या नेत्याविषयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य ठाकरे आपली आई रश्मी ठाकरे यांच्यासमवेत... - Divya Marathi
आदित्य ठाकरे आपली आई रश्मी ठाकरे यांच्यासमवेत...

मुंबई- शिवसेनेचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज (13 जून ) 27 वा वाढदिवस आहे. या वर्षी आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत असलेले सर्वोच्च दुस-या क्रमाकांचे पद 'नेतेपदी' बढती मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेचे ते महत्त्वाचे नेते बनले आहेत. नुकतेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत उद्धव, अमित शहा, मुख्यमंत्र्यांसह त्यांना मोजक्या चार नेत्यांत आदित्य यांचा समावेश होता. आदित्य ठाकरे यांची मुंबईतील तरूणाई, बॉलिवूड मंडळी, सामाजिक क्षेत्रात काम करणा-या संस्था-संघटनांसोबत ऊठबस आहे. आज युथ आयकॉन असलेल्या आदित्य या तरुण नेत्याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

 

आणखी वाचा आदित्य ठाकरे यांच्याविषयी- 

 

- मुंबईतील नाईट लाईफचे समर्थन करत आदित्य ठाकरे यांनी तरुणाईचे लक्ष वेधून घेतले होते. नाईट लाईफमुळे होणारी रोजगार निर्मिती आणि चाकरमान्यांची सोय या बाबींकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. मुंबई 24 तास धावते व काम करते. अनेक जण घराबाहेर असतात त्यामुळे त्यांच्यासाठी नाईट लाईफ गरजेची आहे. मुंबई हे जागतिक शहर आहे. जगातील मोठ्या शहरात सर्वत्र नाईट लाईफ जीवनपद्धती आहे. मुंबई त्याला अपवाद असू शकत नाही, असे आदित्य यांची भूमिका आहे. 

 

- आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रुफटॉप हॉटेलचा प्रस्ताव लावून धरला होता. मात्र, मुंबईतील गेल्या वर्षी कमला मिल दुर्घटनेनंतर हा प्रस्ताव सध्या थंड पडला आहे.

 

- शिवसेनेतील युवा पिढीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. युवा कार्यकर्त्यांशी थेट संपर्क याकडे त्यांचे यश म्हणून पाहिले जाते. मुंबई सिनेट निवडणूक असो की अधिसभा निवडणूक आदित्य यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने एकतर्फी निवडणूका जिंकल्या आहेत. 

 

- मुंबईत पेग्विन आणण्याचा अतिशय धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. याबाबत त्यांच्यावर टीकाही झाली होती. मुंबईत व्हर्च्युअल क्लास रूमचा कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

 

- आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी असून युवासेना या युवाकेंद्रित संघटनेचे प्रमुख आहेत. ते शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना-संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू होत.

 

- आदित्य ठाकरे हे वेळोवेळी मुंबईतील अनेक स्वच्छता मोहिमांमध्ये भाग घेताना दिसतात. आय लव्ह मुंबई ही टॅगलाईनही त्यांच्याच पुढाकाराने मुंबईत ही मोहिम राबवली जात आहे. त्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

 

- आदित्य ठाकरे यांचा जन्म 13 जून 1990 रोजी झाला आहे. त्याचे शालेय शिक्षण माहिममधील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून झाले तर किर्ती लॉ कॉलेज व सेंट झेव्हियरमधून त्यांनी पदवी व पदवीत्तर शिक्षण घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...