आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई अग्निकांडातील आरोपी हैदराबाद विमानतळाच्या सीसीटीव्हीत कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुबंई - 14 लोकांचे प्राण घेणाऱ्या मुंबई अग्नितांडव प्रकरणातील आरोपी आणि मोजोस बारचा सहमालक युग तुली अजूनही फरार आहे. पण आता तो हैदराबादेत लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हैदराबाद एअरपोर्टवरील सीसीटीवीमध्ये तो दिसल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळताच पोलिस त्याठिकाणी पोहोचले पण तो आधीच फरार झाला होता. त्याने कोणत्याही विमानत चेकइनही केले नसल्याची माहिती मिळाली आहे. 


मुंबईच्या लोअर परेलमधील कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बारमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांनी प्राण गमावला होता. या अपघातानंतर हॉटेलने सुरक्षेकडे मोठ्या प्रमाणावर कानाडोळा केल्याने अपघात घडल्याचे समोर आले होते. पोलिस तपासात समोर आले आहे की, याठिकाणी कोणतीही परवानगी न घेता वाईन आणि हुक्का बार चालवला जात होता. 


मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर तुली नागपूरहून हैदराबादला फरार झाला होता. हैदराबादमध्ये काहीदिवस आजीच्या घरी राहिल्यानंतर त्याने विमानाद्वारे फरार होण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. या दरम्यान मुंबई पोलिसांचे पथक तुलीला अटक करण्यासाठी हैदराबादेत दाखल झाले पण तुली पोलिसांच्या हाती आला नाही. कार घेऊन तो निघून गेला असल्याचे त्याच्या आजीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याने अज्ञात स्थळी कार सोडली आणि तो कुठे गेला याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी जवळपास पथके तयार केली असल्याची माहिती मिळत आहे. 

 

पुढे पाहा, घटनेचे काही PHOTOS

 

बातम्या आणखी आहेत...