आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: जिममध्ये सर्वांसमक्ष अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसांत तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत अंधेरी भागातील एका जिममध्ये एका 37 वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग करण्यात आला. चारचौघा समक्ष विश्वनाथ शेट्टी नावाच्या व्यक्तीने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. याबाबतची रीतसर तक्रार संबंधित अभिनेत्रीने पोलिसांत दिली असून, पोलिस तपास करत आहेत.

 

याबाबतची माहिती अशी की, 37 वर्षीय अभिनेत्री मागील काही काळापासून अंधेरीतील एका जिममध्ये जाते. तेथे विश्वनाथ शेट्टी नावाचा एक व्यक्ती मागील काही दिवसापासून तिच्या आसपास फिरू लागला. तसेच बोलण्याचा प्रयत्न करायचा. मात्र, अभिनेत्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. मात्र, अभिनेत्रीने दुर्लक्ष केल्याने शेट्टी जास्तच फेफारला. तू मला आवडते, माझ्यासोबत फिरायला येते का? असे सर्वासमक्ष सांगत तिचा विनयभंग केला. पुढे त्याने अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केली यामुळे ती संतप्त झाली. नंतर त्याने तिला शिवीगाळ करायला सुरूवात केली, असे अभिनेत्रीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलिसांनी जिममधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा जिममध्ये अनेक लोक होते त्यांच्याकडेही पोलिस चौकशी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...