आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण-डोंबिवलीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची लाच घेताना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची रोख रक्कमेची लाच घेताना आज दुपारी अटक करण्यात आली होती. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, वादग्रस्त अधिका-याला लाच घेताना पकडल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये यासाठी संजय घरत यांनी संबंधित व्यक्तीकडे सुमारे 40 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ही तडतोड 35 लाखांवर झाली. त्यातील पहिला हप्ता 8 लाख रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, याबाबतची माहिती एसीबीला देण्यात आली. त्यानंतर आज दुपारी रोख 8 लाख रूपयांची रक्कम स्वीकारताना घरत यांना रंगेहात अटक केली. घरत हे कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे ठाण मांडून बसले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...