आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही ही 5 कामे केल्यास बँकांना द्यावेच लागेल कर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जर तुम्ही कोणता व्यवसाय करु इच्छित असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पैशाचा विचार करता. जर तुम्हाला वाटले की तुमच्याकडे उपलब्ध असणारे पैसे पुरेसे नाहीत तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करता. पण बॅंक तुम्हाला कर्ज देईलच असे नाही. केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच दावा करते की ते बेरोजगारी कमी करण्यासाठी ते स्वयं-रोजगाराला महत्व देतात. युवकांनी नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येते. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की कोणत्या अटी पूर्ण केल्यावर बँक तुम्हाला सहज कर्ज देऊ शकते.

 

 

सगळ्यात पहिली अट
सगळ्यात सहज आणि विनातारण कर्ज तुम्हाला पंतप्रधान रोजगार योजनेतंर्गत मिळु शकते. पण या योजनेतंर्गत करण्यात येणारे जवळपास 88 टक्के अर्ज हे नामंजूर केले जातात. प्रकल्प अहवाल अयोग्य असल्याने मुख्यत: असे घडते. त्यामुळे तुम्ही प्रकल्प अहवाल तयार करताना त्यात लहान-सहान बाबींचीही माहिती द्या. त्यात तुम्ही नमूद करा की तुम्ही बँकेने दिलेल्या कर्जाचा कसा विनियोग करणार आहात. तुमच्याजवळ किती पैसे आहेत हे सुध्दा बॅंकेला सांगा. तुम्ही विक्री करणार असणाऱ्या वस्तुची बाजारातील किंमत, शेड आणि ऑफिसचे भाडे, रॉ मटेरियल, मार्केट पोटेंशियल, बँकेचे व्याज हे सगळे जाऊन तुम्हाला मिळणारा नफा या सगळ्याची माहिती बँकेला द्या. तुम्हाला काही शंका असतील असतील तर  पीएमईजीपीच्या संकेतस्थळावर जवळपास 200 प्रकल्प अहवाल उपलब्ध आहेत. त्यापैकी एखादी निवडुन तुम्ही त्याच्या आधारावर तुमचा प्रकल्प अहवाल तयार करा. आम्ही याची लिंक तुम्हाला देत आहोत

 

येथे क्लिक करा...
 

 

ही आहे दुसरी अट
हे कर्ज बेरोजगार युवकांना देण्यात येते. तरी देखील बॅंक तुमचा सिबिल रिपोर्ट चेक करते. त्यावेळी तुम्हाला कर्ज देण्यात येते. अर्ज करण्यापूर्वी तुमचा सिबिल रिपोर्ट चेक करुन घ्या. जर तो 750 हून कमी असेल तर कारणे जाणून घ्या आणि ती दुर करण्याचा प्रयत्न करा.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...