आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायबॅक घोषणेनंतर टीसीएस बनली सात लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप असलेली देशातील पहिली कंपनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -   देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस सात लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप असलेली देशातील पहिली कंपनी बनली आहे. शुक्रवारी कंपनीचे मूल्य १८,८३७ कोटींनी वाढून ७,०५,०१३ कोटी रुपये झाले आहे. याआधी २५ मे रोजी कंपनीचा मार्केट कॅप सात लाख कोटी रुपयांच्या वर गेला होता. मात्र, बाजार बंद झाला त्या वेळी यात घसरण आली होती. कंपनीचे मूल्य या वर्षी सहा लाख कोटी रुपयांच्या वर गेले होते. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरचे भाव २.७५ टक्क्यांनी वाढून १,८४१.४५ या पातळीवर बंद झाले. दिवसभराच्या व्यवहारात यात ३.१६ टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून आली.  


कंपनीच्या संचालक मंडळाने बायबॅकची घोषणा केल्यामुळे शेअरमध्ये तेजी नोंदवण्यात आली. टीसीएसच्या संचालक मंडळाने १६,००० कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी २,१०० रुपयांच्या दराने ७.६१ कोटी शेअर विकत घेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...