आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत थोडक्यात टळली दोन विमानांची धडक, बालंबाल बचावले 260 प्रवासी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईमध्ये आकाशात बुधवारी दोन विमानांची धडक सुदैवाने थोडक्यात टळली. दिल्लीहून पुण्याकडे जाणारे विस्तारा एअरलाइन्स कंपनीचे युके-९९७ विमान आणि मुंबईहून भोपाळकडे जाणारे एआय-६३१ विमान एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. मात्र वैमानिकांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली. विमान अपघात तपास विभागाकडून (एएआयबी) याचा सखोल तपास केला जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, विस्ताराचे विमान खूप खाली आले होते. दोन्ही विमानात केवळ १०० फुटांचे अंतर होते. विस्ताराच्या विमानात १५२ व एअर इंडियाच्या विमाना १०९ प्रवासी होते.

 

7 फेब्रुवारी रोजी, 152 प्रवाशांना घेऊन दिल्लीवरून पुण्याला जाणारे विस्ताराचे यूके-997 विमान तर 109 प्रवाशांना घेऊन भोपाळहून उड्डाण करणारे एयर इंडियाच्या एआय 631 विमानाजवळ खूपच जवळ आले होते. त्यावेळी दोन्ही विमानातील अंतर केवळ 100 फूट होते. 

 

एयर इंडिया विमानाच्या कॅप्टनने दिलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये लिहले आहे की, विमान केवळ 100 फूट दूर होते. यानंतर त्याला सुरक्षितरित्या दूर घेऊन गेलो. एका अधिका-याने सांगितले की, स्वयंचलित अलर्ट मशीन द्वारा दोन्ही विमानांच्या पायलटना विमाने जवळ येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे होणारा अपघात थोडक्यात टळला.

 

एयरलाईनच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, अलर्ट वाजताच तातडीने एयर इंडिया विमानाच्या कमांडरने वेगाने आपले विमान सुरक्षितरित्या बाजूला नेले. विस्ताराने सुद्धा या घटनेला दुजोरा दिला तसेच चौकशी होईपर्यंत दोन्ही पायलट यांना सेवेतून थांबवले आहे. विमान दुर्घटना चौकशी ब्यूरो (एएआयबी)ने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...