आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला- नियमबाह्य निविदा मंजूर करण्यासाठी अकाेल्याचे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी अापल्यावर दबाव अाणला, धमकी दिली, असा अाराेप जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (एसीईअाे) डॉ. सुभाष पवार यांनी केला अाहे. इतकेच नव्हे तर या त्रासामुळे अापणास स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करावी, असा अर्ज त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण प्रधान सचिवांना पाठवला आहे. दरम्यान, डाॅ. पाटील यांनी मात्र हे अाराेप फेटाळून लावले अाहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री डाॅ. पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेतात. या वेळी जिल्ह्यातील सर्वच िवभागांचे प्रमुख हजर असतात. तक्रार घेऊन अालेल्या नागरिकांची समस्या तातडीने निकाली काढण्याचा त्यांचा प्रयत्न असताे, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच अादेश दिले जातात. १२ फेब्रुवारी रोजी अायाेजित जनता दरबारात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार उपस्थित हाेते. पालकमंत्र्यांनी एका कामाच्या निविदा प्रक्रियेवरून त्यांना धारेवर धरले. या प्रकारामुळे पवार यांनी प्रधान सचिवांकडे राज्यमंत्र्यांची तक्रार करून स्वेच्छा सेवानिवृत्तीचा अर्ज पाठवला. डाॅ. पाटील यांनी एका रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेबाबत धमकी दिल्याचा गंभीर अाराेप पवारांनी केला.
अाराेप बिनबुडाचे, अधिकारी एेकतच नाहीत : राज्यमंत्री पाटील : अधिकारी सुभाष पवार यांनी केलेले अाराेप पूर्णपणे बिनबुडाचे अाहेत, असे स्पष्टीकरण राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी दिले. ग्रामविकासाच्या याेजना िजल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येतात. मात्र, िज.प.चा कारभार समाधानकारक नसल्याचे यापूर्वीच िजल्हा नियाेजन समितीच्या बैठकीसह अनेक िठकाणी उजेडात अाले अाहे. जनता दरबारातही केवळ िजल्हा परिषदेमधीलच प्रकरणे प्रलंबित राहतात. संबंिधत अधिकाऱ्यांना सर्व प्रकरणांचा नियमितपणे अाढावा घ्या, असे सूचित केल्यानंतरही ते तसे करीत नाहीत. परिणामी जनतेची कामे हाेत नसल्याने अधिकाऱ्यांना िवचारणा तर करावीच लागेल. एखादे काम नियमात बसत नसल्यास, तसे व्यवस्थितपणे तांत्रिक बाबींसह अधिकाऱ्यांनी सांगावे. तक्रार मुदतीत व िनयमानुसार निकाली निघणे अावश्यक अाहेत, असे पाटील म्हणाले.
असे अाहे नेमके प्रकरण
सूत्रांच्या माहितीनुसार, पातूर तालुक्यातील अादिवासी विकास याेजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाच्या निविदेबाबत पवार यांनी मंत्र्यांवर अाराेप केला अाहे. या कामासाठी शासनाने ८५ लाखांचा निधी मंजूर केला हाेता. या कामासाठी चार कंत्राटदारांच्या िनविदा अाल्या हाेत्या. एका कंत्राटदाराने कामासाठी अावश्यक अनुभवाचे प्रमाणपत्र निविदेसाेबत जाेडले नव्हते. त्याला दुसऱ्या कंत्राटदाराने अाक्षेप घेतला. त्यानंतर पहिल्या कंत्राटदारामार्फत हे प्रकरण जनता दरबारापर्यंत पाेहाेचवण्यात अाले.
काय अाहे डॉ. सुभाष पवार यांच्या पत्रात
‘डॉ. पाटील यांनी संबंध नसलेल्या कामावरून मला अपमानास्पद वागणूक दिली. जि.प. बांधकाम िवभागाची िनविदा मंजूर करण्यासाठी दबाव अाणला. हा प्रकार नियमबाह्य असल्याचे लक्षात अाणून दिल्यानंतरही पालकमंत्र्यांनी मला धमकी दिली. या प्रकारामुळे माझ्यावर प्रचंड मानसिक दडपण अाले असून यापुढे मी शासकीय सेवा करण्यास इच्छुक नाही,’ असे पवार यांनी वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले अाहे.
रणजित पाटलांवर अाराेपांची मालिका
डॉ. रणजित पाटील हे मंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्याभोवती वादाचे व आरोपांचे सत्र सुरूच आहे. तीन अपत्य असणे, शपथपत्रात संपत्ती लपवणे, बेनामी संपत्ती, मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी नाव असणे, निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे, मुंबई येथील हॉटेल प्रकरणात नगरविकास खात्याने स्थगिती देणे, डॉ. पाटील यांच्या वडिलांनी कर्मचाऱ्याला मारणे आदी विविध प्रकारचे आरोप झाले आहेत.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.