आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा पार पडला अमित ठाकरे-मिताली बोरुडे यांच्या साखरपुडा पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण आणि प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. विशेष म्हणजे आज राज ठाकरे आणि शर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसही आहे. त्याचे औचित्य साधत या साखरपुड्याचा मुहूर्त  पकडण्यात आला.  


अमित-मिताली हे बालपणीचे मित्र असून मागील पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. अमित पोद्दार महाविद्यालयाचा, तर मिताली रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे .  अमित वाणिज्य पदवीधर असून त्याने व्यवस्थापनाचेही शिक्षण घेतले आहे, तर मिताली फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अमितकडे नव्या वर्षांत पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. साधारण मार्च महिन्यात त्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष बनवले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...