आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी न मिळालेल्यांना करता येणार आॅनलाइन तक्रार : सहकारमंत्री सुभाष देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कर्जाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या अथवा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची कार्यप्रणाली तयार करण्याचे काम चालू असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 


मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक झाली.  देशमुख म्हणाले, या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील ४७ लाख ७३ हजार खात्यांवर   कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मंजूर केला आहे. त्यासाठी २३ हजार १०२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी ५  फेब्रुवारी अखेर ३१  लाख ३२ हजार कर्ज खात्यांवर लाभापोटी १२ हजार ३६२ कोटीची कर्ज रक्कम वितरित करण्यात आली आहे.  योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती व बँक खात्यांची माहिती यांची पडताळणी करण्यात आली आहे. कर्ज खाती योजनेच्या निकषात न बसणाऱ्या एकूण ४ लाख ७७ हजार कर्ज खात्यांबाबतची (पिवळी यादी) माहिती संकेतस्थळाद्वारे बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील १ लाख ७५ हजार खात्यांची तपासणी करून फेर प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.  

 

माहितीच्या शहानिशेसाठी तालुकास्तरीय समिती  
योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांची माहिती बँकेकडील माहितीशी जुळत नसेल. तर,  अशा शेतकऱ्यांच्या खात्यांच्या माहितीची शहानिशा करून निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या अाहेत. या समितीद्वारे निर्णय प्रक्रियेसाठी २१ लाख ६९ हजार कर्जखाती ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी बँकांनी ५ फेब्रुवारी अखेर एकूण ५ लाख ६५ हजार खात्यांची माहिती अपलोड केल्याचे देशमुख म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...