आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या भेटीसाठी अाशिष शेलार बारामतीत; भाजप कार्यकर्त्यांकडे पाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती / मुंबई- केंद्र व राज्यात भाजपचे सरकार अाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र माेदींसह भाजपच्या अनेक नेत्यांचा बारामतीत येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्याचा सुरू झालेला िसलसिला अजून थांबलेला नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष व अामदार अाशिष शेलार यांनी शुक्रवारी पवारांशी बारामतीत येऊन चर्चा केली. त्याचा तपशील मात्र दाेन्ही बाजूने गाेपनीय ठेवण्यात अाला. दरम्यान, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची व नेत्यांची भेट न घेताच शेलार मुंबईला परतले त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली.  


अामदार शेलार हे मुंबई क्रिकेट असाेसिएशनचे अध्यक्षही अाहेत. या संघटनेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संमतीशिवाय पानही हलत नाही. शेलार यांची नियुक्तीही पवार यांच्या संमतीनेच झाल्याचे सांगितले जाते. शेलार व पवार यांची शुक्रवारची भेट ही राजकीय नसून मुंबई क्रिकेट असाेसिएशनच्या कामासंदर्भात हा दाैरा असावा, असा तर्क काढला जात अाहे.  दरम्यान, शेलार यांनी बारामतीत नव्याने उभारण्यात अालेले भव्य स्टेडियम, विद्या प्रतिष्ठानचे शैक्षणिक संकुल व तेथील वस्तुसंग्रहालयाचीही पाहणी केली. माळेगावात पवार कुटुंबीयांच्या वतीने उभारण्यात अालेल्या अद्ययावत विज्ञान केंद्रालाही भेट देऊन शेलार यांनी तेथील कामाची पाहणी करून काैतुक केले. या भेटीचे वृत्त प्रसार माध्यमांपर्यंत पाेहाेचू नये म्हणून काळजी घेण्यात अाली हाेती. दरम्यान, अामदार शेलार हे बारामतीत येऊनही न भेटल्याची नाराजी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी खासगीत व्यक्त केली. 


हा खासगी दाैरा : शहराध्यक्ष 
बारामतीचे भाजप शहराध्यक्ष यशपाल भाेसले यांना यांना विचारणा केली असता ‘शेलार यांचा कालच अाम्हाला फाेन अाला हाेता, त्यांनी बारामतीत येत असल्याची कल्पना दिली हाेती. मात्र त्यांचा हा दाैरा पूर्णपणे खासगी स्वरुपाचा असल्यामुळे त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेतली नाही,’ अशी सारवासारव भाेसले यांनी केली. 

 

अशीही चर्चा.... मंत्रिपदी वर्णी लागल्यास अध्यक्षपद कुणाकडे? 

फडणवीस सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हाेणार असल्याचे भाजपच्या गाेटातून सांगितले जाते. भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे अाराेप अाहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना डच्चू मिळाल्यास किंवा त्यांचे खातेबदल झाल्यास त्यांच्या जागी मुंबईतील अामदार शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. तसे झाल्यास ‘एमसीए’चे अध्यक्षपद नंतर काेणाकडे साेपवायचे, यादृष्टीने शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी शेलार बारामतीत गेले हाेते, अशी चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात हाेती.

बातम्या आणखी आहेत...