आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण; एकनाथ खडसे यांचा भाचा ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेपत्ता अश्विनी बिद्रे यांची खून झाल्याचा संशय आहे. - Divya Marathi
बेपत्ता अश्विनी बिद्रे यांची खून झाल्याचा संशय आहे.

मुंबई/जळगाव- सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे (बिंद्रे) बेपत्ता प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना जळगाव येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

ज्या दिवशी अश्विनी गोरे बेपत्ता झाल्या, त्या काळात राजेश पाटील व अभय कुरुंदकर यांच्यात मोबाइलवर संभाषण झाले होते. तसेच त्या कालावधीत राजेश पाटील हा जळगावहून मुंबईत आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राजेश पाटील याचा या प्रकरणाशी संबध असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

 

कोल्हापूर जिह्यातील महिला पोलिस अधिकारी अश्विनी गोरे यांची दीड वर्षांपूर्वी रत्नागिरी येथून कोकण परिक्षेत्राच्या नवी मुंबई येथील नागरी हक्क संरक्षण विभागात बदली झाल्यानंतर 11 एप्रिल 2016 पासून त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. अश्विनीच्या कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताचा संशय व्यक्त करत या मागे अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप करत हाय कोर्टात धाव घेतली होती. अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यातील मोबाइल संवादाचे व काही चित्रफितीचे पुरावेही कोर्टात सादर केले होते. कळंबोली पोलिसांनी अभय कुरुंदकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांना गुरुवारी अटकही केली होती.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...