आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील दुष्काळावर उपाय शाेधण्यास बबनराव लाेणीकर निघाले इस्रायलला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वात ९ ते १३ जूनदरम्यान शिष्टमंडळ इस्रायलच्या अभ्यास दौऱ्याला जात आहे. पाणी पुरवठा  विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलारासू, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (जालना) अजय सिंहांसह लाेणीकरांचे खासगी सचिव बप्पासाहेब थोरात यांचाही या शिष्टमंडळामध्ये समावेश अाहे.   

 
इस्रायलमध्ये वाळवंटासारखी परिस्थिती असूनही जलसंधारण, पाण्याचा पुन: वापर, पुन:चक्रीकरण इत्यादी क्षेत्रांत उच्च दर्जाची कामे करण्यात आली आहेत. या अनुभवाचा मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी उपयोग करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न अाहे. त्यासाठी इस्रायल शासन मालकीच्या मे. मेकोरोट कंपनीसोबत करार झाला आहे. मराठवाड्यातील प्रस्तावित उपाययोजनेचे स्वरूप निश्चितीसाठी २ वर्षात विविध प्रकारचे अहवाल तयार केले जातील. त्या अनुषंगाने इस्रायलमधील उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ जाणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...