आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीअायने बंदोबस्ताचे 13.42 कोटी रुपये थकवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- क्रिकेट मॅच आयोजित करून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कमावणारे भारतीय क्रिकेट बाेर्ड (बीसीसीआय) सर्वात श्रीमंत बाेर्ड मानले जाते. मात्र सामन्यांच्या आयोजनामधून कोट्यवधी रुपये कमवत असतानाही  क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी मुंबई पाेलिसांकडून बंदाेबस्त घेणाऱ्या बीसीसीअायने त्यांचे शुल्क मात्र अद्याप प्रदान केले नसल्याचे समाेर अाले अाहे. १७ क्रिकेट सामन्यांचे सुमारे १३.४२ काेटी रुपये बंदाेबस्त शुल्क बीसीसीअायकडे थकीत अाहे. मुंबई पोलिसांनी अनेक वेळा आठवण करून देऊनही बीसीसीआय पैसे देत नसल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी या रकमेवर अजूनही व्याजाची आकारणीही केलेली नाही. 


‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या पॅनलची बीसीसीआयवर सत्ता असल्याने पोलिस आस्ते कदम चालत असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.   


गेल्या १० वर्षांत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी दिला गेलेला पोलिस बंदोबस्त आणि त्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्काची माहिती गलगली यांनी मागितली होती. जन माहिती अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त (समन्वय) तानाजी सुरुलकर यांनी पाेलिसांच्या बंदोबस्त शाखेने दिलेली माहिती त्यांना उपलब्ध करून दिली.  


खासगी कंपनीनेही दिले नाही शुल्क  
वर्ष २००८ पासून २०११ दरम्यान झालेल्या सामन्यांचे बंदोबस्त शुल्क ३४  कोटी ३३ लाख ४४ हजार ६१८ इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने वेळेवर अदा केले नसतानाही मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे व्याज वसूल केले नाही. २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्तांना पत्र पाठवूनही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...