आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री रावतेविरोधात पोस्ट टाकणाऱ्याचे निलंबन मागे; परिवहन खात्याकडून निलंबन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळे इस्लामपूर आगारातील कर्मचारी शरद महादेव जंगम (रा. येडेनिपाणी, ता. वाळवा) यांना निलंबित करण्यात अाले हाेते. मात्र या प्रकरणी प्रसिद्धिमाध्यमांतून जाेरदार टीकेची झाेड उठल्यानंतर अखेर महामंडळाने साेमवारी जंगम यांचे निलंबन मागे घेतले.  


वर्कशॉप मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या जंगम याची पोस्ट व्हायरल होताच शनिवारी त्याच्यावर परिवहन खात्याने निलंबनाची कारवाई केली होती. शरद जंगम याने शुक्रवारी मंंत्री रावते यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये त्याने म्हटले होते, ‘महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना खुले आव्हान देतो की, एकदा कामगारांसमोर या आणि आपली भूमिका स्पष्ट करा. हे महामंडळ जर नीट चालवता येत नसेल आणि कामगारांना त्यांची हक्काची वेतनवाढ देता येत नसेल तर... चालते व्हा... कामगारशक्तीचा अंत बघू नका... आणखी एक गोष्ट, आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरणारे नाही... लिहिला की फेकला..’  जंगम याची पोस्ट फेसबुक, व्हॉट्सअवर झपाट्याने व्हायरल झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...