आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या जामीन अर्जावर 18 डिसेंबरला सुनावणी; न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील निर्णय पीएमएल न्यायालयाने राखून ठेवला आहे. १८ डिसेंबर रोजी याचा निर्णय दिला जाईल. वैद्यकीय कारणामुळे जामीन देण्याची मागणी करणारा भुजबळांचा अर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, अशा प्रकरणांशी संबंधित कलमच रद्द झाल्याने भुजबळांच्या सुटकेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


 २०१५ मध्ये सक्तवसूली संचलनालयाने ९०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी भुजबळांविरोधात दोन गुन्हे नोंदवले होते. जून २०१५ मध्ये त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून भुजबळ तुरुंगातच आहेत. त्यानंतर त्यांनी तब्येतीचा हवाला देत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला होता. 

बातम्या आणखी आहेत...