आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया परीक्षार्थ्यांना आळा घालण्यासाठी MPSC परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)  गैरप्रकारांना रोखण्यासाठी यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेला तोतया बसवून प्रशासनात उच्च पदाच्या जागा अनेक अधिकाऱ्यांनी पटकावल्याचे समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) या गैरप्रकारांना रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे. 

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येतात. मात्र या परीक्षा न देता आपल्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला बसवून अगदी अ श्रेणीच्या पदांवर विराजमान झालेले अधिकारी प्रशासनात अद्यापही कार्यरत आहेत. राज्याच्या प्रशासनात जवळपास पन्नास अधिकाऱ्यांनी तोतयांच्या जिवावर पदे मिळवल्याचे तपासात समोरही आले आहे. सातत्याने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तोतयांना पकडण्यात येत आहे. तोतया परीक्षार्थीची ही साखळी समोर आल्यानंतर आता आयोगाला जाग आली आहे. आयोगाच्या परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

 

 

परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांकडूनही बायोमेट्रिक हजेरी आणि परीक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर बसवण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी काही परीक्षांसाठी मोबाइल जॅमर बसवण्याचा प्रयोग आयोगाने केला आहे. आता बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांचे आधार क्रमांक आणि त्यावरील बोटाचे ठसे यांच्या आधारे ही हजेरी घेण्यात येईल. उमेदवारांना आधार क्रमांक नोंदवणे सक्तीचे असल्याची सूचना आयोगाने यापूर्वीच दिली आहे. त्यासाठी आयोगाकडून विविध कंपन्यांकडून प्रस्तावही मागवण्यात आले आहेत.

 


पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...