आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे नवी दिल्लीत निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार चिंतामन वनगा.... - Divya Marathi
खासदार चिंतामन वनगा....

मुंबई- पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा (67) यांचे आज सकाळी नवी दिल्लीत हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिल्लीतील राममनोहर लोहिया रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचा आदिवासी चेहरा राहिलेले वनगा तीन वेळा खासदार राहिले आहेत. पालघर या अनुसुचित जमाती (एसटी) साठी आरक्षित असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते. पेशाने वकिल राहिलेल्या वनगा यांनी भाजप ठाणे जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषवले होते. असे राहिले राजकीय करिअर...

 

- चिंतामण वनगा हे 1996 मध्ये पहिल्यांदा भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले होते.

- त्यानंतर 1999 साली तो लोकसभेवर दुस-यांदा निवडून गेले.
- 2014 साली त्यांनी बळीराम जाधव यांचा पराभव लोकसभेत प्रवेश केला होता.
- 2009 साली ते विक्रमगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते.

 

समर्पित नेतृत्व हरपले- मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

 

पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते.  विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, चिंतामन वनगा यांचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...