आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंची राहुल गांधींसोबत दिल्लीत गुप्त बैठक, खडसे म्हणाले, पद्मावत पाहत होतो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे. - Divya Marathi
एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे.

मुंबई- भाजपात सध्या एकाकी पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांनी मंगळवारी (30 जानेवारी) आपली खासदार सून रक्षा खडसे, कन्या शारदा खडसे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची गुप्त भेट घेतली. ही भेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घडवून आणल्याचे समोर येत आहे. 

 

राहुल गांधींसोबतच्या या भेटीत खडसे यांनी काँग्रेस प्रवेशाबाबत चाचपणी केली. सर्व काही जुळून आले तर एकनाथ खडसे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भंडारा-गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा पोटनिवडणुकांच्या पूर्वीच खडसे भाजपला रामराम करतील असे बोलले जात आहे.

 

सोमवारी (29 जानेवारी) सायंकाळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह खडसे औरंगाबादहून विमानाने एकत्रच दिल्लीपर्यंतचा प्रवास केला होता. याला खडसेंसह पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्यानंतर ते स्नुषा रक्षा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामी थांबले.

 

त्यानंतर मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास खडसेंनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खडसेंनी त्यावेळी गडकरी यांच्याकडेच ब्रेकफास्ट घेतला व तासभर चर्चा केली. यानंतर खडसे मोबाईल स्वीच ऑफ करून गायब झाले. चर्चा अशी ही आहे की, खडसे नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या मदतीने राहुल गांधींची भेट घेतली व काँग्रेस प्रवेशाबाबत चाचपणी केली. यावेळी खडसेंची खासदार सून रक्षा खडसे व कन्या शारदा उपस्थित होत्या.

 

भाजप सोडण्याचा विचार असताना नितीन गडकरींच्या भेट का?

 

एकनाथ खडसे हे खरं तर पूर्वी गोपीनाथ मुंडे गटाचे पण मुंडेंच्या निधनानंतर काळाची पावले ओळखत ते गडकरी गटात सामील झाले. नितीन गडकरी यांनीच मला मुख्यमंत्री करत नसाल तर एकनाथ खडसे किंवा रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी हालचाल केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब केले होते. आपल्याला जड जाईल असा मुख्यमंत्री नको होता त्यामुळे देवेंद्र यांच्या नावाला पसंती देताच ज्येष्ठ नेते काहीसे नाराज झाले होते. त्यात खडसे आघाडीवर होते. खडसेंना आतून गडकरींची साथ होती असे वारंवार बोलले गेले.

 

केंद्रात मोदी-शहांची एकहाती वर्चस्व व राज्यात त्यांनी फडणवीसांना दिलेली मोकळीक यामुळे सध्याच्या भाजपमध्ये आपल्याला भवितव्य दिसत नसल्याने खडसे विविध पर्याय तपासत आहे. त्यापूर्वी गडकरींसोबत त्यांनी काही खलबते केली असावीत असे राजकीय वर्तूळात बोलले जात आहे. मात्र, खडसेंची वक्तव्ये व त्यांच्या हालचाली पाहता ते लवकरच भाजपला रामराम करण्याच्या मूडमध्ये आले आहे हे स्पष्ट होत आहे. 

 

खडसेंनी राहुल गांधी भेटीचे वृत्त फेटाळले-

 

दरम्यान, राहुल गांधींची भेट झाल्याच्या बातम्या येताच एकनाथ खडसे यांनी काँग्रेस अध्यक्षांसोबत आपली भेट झाली नसल्याचे म्हटले आहे. मंगळवारी आपण मुलगी व सूनबाई यांच्यासमवेत पद्मावत सिनेमा पाहिला गेलो होतो. ज्या काही बातम्या येत आहेत दिल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...