आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'....तर RSS पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्याऐवजी प्रणव मुखर्जी यांना पुढे करणार\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणव मुखर्जी यांनी नुकतीच संघाच्या दरबारात हजेरी लावली. - Divya Marathi
प्रणव मुखर्जी यांनी नुकतीच संघाच्या दरबारात हजेरी लावली.

मुंबई- 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघ माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना सर्वमान्य उमेदवार म्हणून पुढे करेल, असा दावा शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच 2019 मध्ये भाजपच्या जागा 282 वरून 170 पर्यंत खाली येतील असे भाकीतही वर्तवले.

 

संजय राऊत यांनी आज सकाळी 'ANI' या वृत्तसंस्थेशी बोलताना हा दावा केला आहे. राऊत म्हणाले की, पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किमान 110 जागा कमी होणार आहेत. त्यामुळे अपेक्षित जागा न मिळाल्यास आपल्याकडेच सत्ता राखण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपला सत्तेची जुळवाजुळवा न जमल्यास मोदींऐवजी प्रणव मुखर्जी यांच्यासारखा सर्वमान्य चेहरा पुढे करण्याची खेळी खेळली जाऊ शकते असे आम्हाला वाटते, असे राऊत यांनी बोलताना सांगितले.

 

दरम्यान, भाजपच्या 110 जागा कमी होतील व पंतप्रधानपदासाठी मुखर्जी यांचे नाव पुढे करण्यात येईल या संजय राऊतांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तूळातून काय प्रतिक्रिया येतात याची उत्सुकता आहे. 

बातम्या आणखी आहेत...