आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMC Budget 2018: शाळा खासगीकरणाचा पालिकेचा घाट, 649 द्विभाषिक शाळा सुरू होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार झाला. महापालिका आयुक्त अजोय मेहता हे आज दुपारी स्थायी समितीला हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते बांधणी व रूंदीकरण, आरोग्य व शिक्षण आदींवर भरवी तरतूद केली आहे. सोबतच मुंबईकरांवर यंदा कोणताही कर बोझा व अतिरिक्त भार पडणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

 

मुंबई महापालिकेचे 2018-19 साठी सुमारे 27 हजार 258 कोटींचे बजेट सादर करण्यात आले. गेल्यावर्षी 25 हजार कोटींच्या तरतूदीचे बजेट सादर केले होते. त्यातील महापालिकेने आतापर्यंत 40 टक्के रक्कम खर्च केली आहे. तसेच विविध प्रकल्प व पुढील दोन महिन्यात आणखी तरतूदीतील 35 ते 40 टक्के रक्कम खर्च होईल असे सांगण्यात येत आहे. 

 

मुंबई महापालिकेचे हक्काचे उत्पन्नाचा मार्ग असलेली जकात रद्द करून देशात जीएसटी लावल्याने सरकारकडून महापालिकेला दरमहा अनुदान दिले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांवर करांचा बोझा लादला गेला नाही. 

 

शिक्षण विभागासाठी 2569 कोटींची तरतूद-

 

मुंबई महापालिकेने आजच्या बजेटमध्ये शिक्षण विभागावर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी शिक्षण विभागासाठी 2569 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 2311 कोटी रुपये इतकी होती. यंदा त्यात 258 कोटींची भर घातली गेली आहे. 

 

गेल्या काही दिवसापासून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची घटती संख्या व बंद पडलेल्या शाळा सुरू करण्यासाठी त्या खासगी तत्त्वावर देण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. सुमारे 35 शाळा खासगी सहभागाने सुरू करून त्याचे उत्तरदायित्त्व कमी करून जबाबदारी झटकण्याचे कवायत सुरू केली आहे. सोबत मुंबई शहरात यंदा व पुढील काही काळात तब्बल 649 शाळा द्विभाषिक सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे मराठी भाषा व शाळांवर एकप्रकारे गंडातरच येणार आहे.

 

मुंबईतील 24 विभागात 24 इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. सोबतच कॅम्प्यूटर लॅब, शाळांत साऊंड सिस्टिम, 1300 वर्गात डिजिटल क्लासरूम, 381 शालेय इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, टॅब वाटप, मोफत बस प्रवास योजना, पोषण आहार, सॅनिटरी नॅपकिन आणि बर्निंग मशिन आदींसाठी आजच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...