आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळावर मात करण्यासाठी बांधणार पूल, बंधारे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुष्काळावर मात करण्याचा एक वेगळा उपाय म्हणून राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर पूल वजा बंधारे बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्यात ९८, विदर्भात ४१  , पुण्यात ११, नाशिकमध्ये १७ असे एकूण १६७ बंधारे वजा पूल बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत दिली.


तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी सातत्याने जल संवर्धनाचा आग्रह धरल्यामुळेच  त्यांच्या काळात अमरावतीमध्ये पहिला  पूल वजा बंधारा प्रकल्प उभा राहू शकला. अमरावतीमधील पाण्याचा प्रश्न सोडवणारा हा पूल म्हणजे जलसंवर्धन क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेली एक प्रकारे देणगी आहे. त्यावरूनच प्रेरणा घेऊन हा प्रकल्प उभारण्याचा विचार केला. अशाच प्रकारचे बंधारे अगोदर बांधल्या गेले असते तर दुष्काळात लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली नसती, अशी खंतही गडकरी यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून काम करताना या राज्याचा अधिक विकास व्हावा म्हणून राज्यात पाच लाख कोटी रुपयांची कामे करण्याचा संकल्प केला होता. त्यातील राष्ट्रीय महामार्ग, जलस्रोत, नदीजोड, बंदरे विकास आदी कामावर आत्तापर्यंत २ लाख ८० हजार कोटींहून अधिक रुपयांची कामे झाली आहेत. वर्षभरात पाच लाख कोटींहून अधिक रुपयांची कामे करण्याचा आपला मानस असल्याचेही गडकरी म्हणाले.

 

१६ हजार किमीचे रस्ते केले
या प्रकल्पामुळे ५० हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. सतत पाणी बंधाऱ्यात राहिल्यामुळे जल संवर्धनाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागण्यास मदत होऊ शकेल. त्याच प्रमाणे आसपास क्षेत्रातही पाणी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

 

बातम्या आणखी आहेत...