आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; कर्जमाफी, गारपिटीचा मुद्दा गाजणार, विराेधक अाक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन साेमवारपासून सुरू हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त बैठक घेऊन कर्जमाफी, गारपिटीचे नुकसान यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर फडणवीस सरकारला अधिवेशनात जाब विचारण्याचा निर्णय घेतला अाहे. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाच्या वतीनेही विराेधकांच्या अाराेपांना उत्तर देण्यास अाम्ही सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री म्हणाले, ‘शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पारदर्शीपणेच हाेत अाहे. अाजवर १३ हजार काेटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात अाले अाहेत. राज्यात गारपिटीमुळे २ लाख ६२ हजार ८७७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. या शेतीचे  पंचनामे पूर्ण करून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल त्यांना मदत देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली अाहे. तसेच ओखी, कापूस आणि धान पिकावर आलेल्या रोगराईच्या नुकसानीपोटी घोषणेप्रमाणे २ हजार ४२५ कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. सध्या हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र त्याची प्रतीक्षा न करता राज्य आपत्ती निवारण निधीतून (एसडीआरएफ) मदत वाटप सुरू केले अाहे. मात्र विराेधक कुठलीही माहिती न घेता बिनबुडाचे अाराेप करत अाहेत.’ 

बातम्या आणखी आहेत...