आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई लोकलचे कार्यक्षेत्र वाढणार, 1853 ते आतापर्यंतचा असा राहिला ट्रेनचा प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 1853 मध्ये मुंबईत धावलेली पहिली लोकल ट्रेन (वर), वर्ष 2017 मध्ये मुंबईत सुरू झालेली पहिली एसी लोकल ट्रेन... - Divya Marathi
वर्ष 1853 मध्ये मुंबईत धावलेली पहिली लोकल ट्रेन (वर), वर्ष 2017 मध्ये मुंबईत सुरू झालेली पहिली एसी लोकल ट्रेन...

मुंबई- मोदी सरकारच्या आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील शेवटचे पूर्ण बजेट अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केले. या बजेटमध्ये मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेनचे नेटवर्क 90 किलोमीटरपर्यंत क्षेत्रफळ वाढविण्याची घोषणा झाली. यासाठी बजेटमध्ये 11 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पहिली लोकल ट्रेन मुंबई ते ठाणे या दरम्यान 1853 मध्ये धावली होती. 165 वर्षाच्या या प्रवासात लोकल ट्रेनमध्ये अनेक मोठे बदल होत गेले. आज आम्ही तुम्हाला 1853 ते 2018 पर्यंत लोकल ट्रेनच्या प्रवासाबाबत माहिती सांगणार आहोत. असा होता पहिल्या ट्रेनचा प्रवास...

 

- 16 एप्रिल, 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाण्यादरम्यान धावली.
- 4 बोगीच्या त्या ट्रेनला 3 इंजिन ओढत होते. ज्याचे नाव होते- सुल्तान, सिंध आणि साहिब. 
- या ट्रेनला 21 बंदूकांची सलामी देऊन रवाना करण्यात आले होते. आपल्या पहिल्या प्रवासात या ट्रेनने फक्त 35 किलोमीटरचे अंतर कापले होते.
- या ऐतिहासिक रेल प्रवासाचे 400 प्रवासी साक्षीदार होते.  
- पहिल्यांदा सुरू झालेल्या या ट्रेनमध्ये शौचालयाची सुविधा नव्हती. प्रवाशांच्या मागणीनंतर 1909 मध्ये ट्रेनमध्ये टॉयलेटची सुविधा सुरू झाली. 

 

1853 ते 2018 असा राहिला मुंबई ट्रेनचा प्रवास...

 

- 16 एप्रिल, 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाण्यादरम्यान धावली.
- देशातील पहिली वीजेवर चालणारी लोकल ट्रेन (ईएमयू) 3 फेब्रुवारी, 1925 रोजी विक्टोरिया टर्मिनस (आजचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते कुर्ला दरम्यान धावले होती.
- भारतातीलच नव्हे तर आशियातील ही पहिली इलेक्ट्रिक ट्रेन होती. ही ट्रेन सिमेंटच्या फरशीची आणि चार डब्ब्याची होती.
- त्या काळी इलेक्ट्रिक इंजिनांना क्रोकोडाईल (मगर) नावाने ओळाखले जायचे.
- 1950 मध्ये वाढली मुंबईमध्ये लोकल ट्रेनची संख्या वाढली.
- स्वतंत्र्यानंतर 1950 मध्ये रेल्वेने पपहिला मोठा बदल करत मुंबईत लोकल ट्रेनची संख्येत वाढ झाली.
- 1957 मध्ये चर्चगेट ते महालक्ष्मीपर्यंत विशेष नवी लोकल ट्रेन सुरू झाली.
- 1960 मध्ये 8 डब्यांची पहिली लोकल ट्रेन धावू लागली.
- वर्ष 1970 मध्ये मुंबईतील चर्चगेट स्टेशनवरून देशातील पहिली पांढरी लोकल ट्रेन सुरू झाली.
- वर्ष 1975 मध्ये मुंबई लोकल ट्रेनची डब्ब्यांची संख्या 8 वरून 9 केली गेली. 
- वर्ष 1980 मध्ये पहिली महिला लोकल ट्रेन सुरू झाली. त्याच वर्षी लोकल ट्रेन कोचची संख्या 12 इतकी केली.
- वर्ष 2009 मध्ये रेल्वेमंत्री ममता बनर्जी यांनी 15 डब्ब्यांची लोकल ट्रेनला ग्रीन सिंग्नल दिला होता.
- वर्ष 2014 मध्ये सुरू झालेली देशातील स्टीलने बनलेली पहिली लोकल ट्रेन. वजनाने कमी असण्यासोबतच तिचा वेगही भन्नाट आहे.
- वर्ष 2016 मध्ये डीसी लोकल ट्रेन 91 वर्षे सेवा दिल्यानंतर सेवेतून बाद केली.
- वर्ष 2017 मध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने देशात पहिली एसी लोकल ट्रेन मुंबईत बोरीवली स्टेशन ते चर्चगेट दरम्यान धावली. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा राहिला मुंबई ट्रेनचा प्रवास...

बातम्या आणखी आहेत...