आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai बारमध्ये गोळीबार प्रकरणी हरियाणातील बिझनेसमन आणि बॉडीगार्ड्सना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हरियाणातील एक बिझनेसमन आणि त्याच्या बॉडीगार्ड्सना पोलिसांनी अटक केली आहे. येथील एका बारच्या व्हीआयपी लाँजमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सात जणांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळतेय. बारमध्ये शस्त्र आणण्यास परवानगी दिल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजतेय. 


एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 24 जूनची ही घटना असून बारमालकाने पोलिसांपासून ती लपवण्याचा प्रयत्न केला होता. बारमधील स्टाफने या सर्वांना बारमध्ये शस्त्र नेण्यास परवानगी दिली. मात्र बारमध्ये गोळीबार करण्यात आल्यानंतर गोंधळ झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या सर्वांना अटक केली आहे. या बिझनेसमनचे नाव मात्र अद्याप समजलेले नाही. तसेच बारमधील शस्त्र हातात असलेल्या महिलांचे फोटोही समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS

 

बातम्या आणखी आहेत...