आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंध तोडल्याने 68 वर्षीय अभिनेत्री झीनत अमानला त्रास देणा-या 38 वर्षीय बिझनेसमॅनला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
66 वर्षीय झीनत अमान... - Divya Marathi
66 वर्षीय झीनत अमान...

मुंबई- अभिनेत्री झीनत अमान हिचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या सर्फराज अहसान ऊर्फ अमर खन्ना या बिझनेसमॅनला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. झीनत यांनी 30 जानेवारी रोजी खन्नाविरोधात मानसिक छळ केल्याचा व धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कलम 304 ड (पाठलाग करणे) आणि 509 (महिलेला अपमानास्पद वागणूक देणे) याकलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 68 वर्षीय झीनत अमान 70 व 80 च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सत्यम शिवम सुंदरम, द ग्रेट गॅम्बलर यासारखी सुपरहिट फिल्ममध्ये काम केले आहे. काय आहे प्रकरण....

 

- 68 वर्षीय झीनत अमान आणि 38 वर्षीय बिझनेसमॅन सर्फराज ऊर्फ अमर खन्ना यांच्यात प्रेमसंबंध होते.
- या दोघांतील नातेसंबंध दोन्ही कुटुंबांना माहित होते. ते एकत्र राहत होते व सर्वत्र फिरत होते.
- झीनत आणि सर्फराज यांनी भागीदारीत काही व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्यात तोटा झाला.
- त्यामुळे झीनतने सर्फराजकडे नुकसानीच्या पैशाची मागणी केली. मात्र, त्याने हात वर केले.
- यामुळे झीनतने सर्फराजसोबतचे व्यावसायिक व प्रेमसंबंधही तोडले. त्यामुळे सर्फराज निराश झाला.
- आरोपी सर्फराज मागील काही दिवसापासून झीनत यांच्याशी संपर्क साधत होता. मात्र, झीनत त्याला टाळत होती.
- त्यामुळे सर्फराजने झीनत यांना त्रास देणे सुरू केले. मोबाईलवरून फोन करणे, व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेजेस पाठवू लागला.
- एवढेच नव्हे तर काही दिवसापूर्वी सर्फराज दारूच्या नशेत अभिनेत्रीच्या घरात घुसला व झीनत यांच्याशी गैरवर्तन केले.
- झीनत यांनी सोसायटीतील सुरक्षारक्षकाला त्याला आत सोडण्यास मनाई केली होती. त्यानुसार सुरक्षारक्षकाने सर्फराजला अडवले. त्यामुळे त्याने त्यालाही जोरदार मारहाण केली.
- त्याचवेळी सोसायटीमध्ये शिवीगाळ करत तमाशा घातला होता. सोसायटीतील लोक या प्रकाराने त्रस्त झाले.
- झीनत यांनी सर्फराज याला वारंवार ताकीद देऊन तो त्यांचा पाठलाग सोडत नव्हता. शेवटी आरोपीच्या त्रासाला कंटाळून झीनत यांनी जुहू पोलिसांत धाव घेतली होती.
- अखेर आरोपी सर्फराज ऊर्फ अमन खन्नाला जुहू पोलिसांनी अटक केली.
- मात्र 80 च्या दशकात तरूणांच्या गळ्यातील ताईत असणा-या 68 वर्षीय झीनत अमानला तिचे उतरत्या वयातील प्रेमप्रकरण चांगलेच भोवल्याची चर्चा सोसायटीतील लोकांत आहे.

 

अमर खन्नाच्या पत्नीने केले झीनत यांच्यावर गंभीर आरोप-

 

- बिझनेसमॅन सर्फराज अहसान ऊर्फ अमर खन्ना हा फिल्ममेकर राहिला आहे. मात्र, आता तो रियल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करतो.
- सर्फराजची पत्नी दिपाली पाटील हिने दोन वर्षापूर्वी अभिनेत्री झीनत अमानने आपल्या पतीला नादाला लावल्याचे आरोप केले होते. तसेच झीनतने सर्फराजसोबत लग्न केल्याचा आरोप केला होता.
- पती अमर खन्नाच्या बॅंक खात्यावरून झीनत अमान हिच्या बॅक खात्यात कोट्यावधी रूपये वळते केल्याचाही आरोप दिपाली पाटील हिने केला होता.
- झीनतने माझ्या पतीला पैशासाठी जवळ केले असून, ती त्याला लुटत असल्याचा आरोप केला होता.
- झीनत अमानला मी जेव्हा याबाबत फोनवरून विचारले असता तिने माझा नंबर ब्लॉक केल्याचा आरोप केला होता.
- दरम्यान, त्यावेळी सर्फराज याने पत्नी दिपालीचे आरोप फेटाळून लावले होते. मी झीनतसोबत लग्न केले नाही. ती माझी जवळची मैत्रिण आहे. तसेच माझ्या कंपनीच्या संचालक मंडळावर असल्याचे सर्फराज याने म्हटले होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...