आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेपाच हजार कोटींचा मालक डोंगर- द-या पार करत देवदूत बनून धावला गरीबांच्या मदतीला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीनमसाळ येथील आदिवासी पाड्यावर पोहचण्यासाठी डोंगर-द-या पार करताना सावजीभाई ढोलकिया... - Divya Marathi
तीनमसाळ येथील आदिवासी पाड्यावर पोहचण्यासाठी डोंगर-द-या पार करताना सावजीभाई ढोलकिया...

तिनसमाळ (नंदूरबार)- कंपनीतील १२०० कर्मचाऱ्यांना दिवाळी बाेनस म्हणून कार भेट देणारे सुरत (गुजरात) येथील उद्योगपती सवजीभाई ढोलकिया यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तिनसमाळ (ता. धडगाव) गावातील समस्यांची बातमी दैनिक दिव्य मराठीमध्ये वाचली अाणि या गावच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. गावातील शाळेत सौर पॅनल बसवणे,पाड्यांमध्ये सोलर पथदिवे बसवणे, पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नर्मदा नदीतून जलवाहिनी टाकण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच ३० तरुणांना सुरत येथे घर व चांगल्या पगाराची नोकरी देण्याचा प्रस्ताव ठेवला. 'दिव्यमराठी'ची बातमी वाचली अन् धावले आदिवासींच्या मदतीला....

 

- या गावातील समस्यांविषयी ‘दिव्य मराठी’ने २४ जानेवारीच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली हाेती. 
- ही बातमी वाचल्यानंतर सुरत येथील हरिकृष्ण एक्स्पोर्टचे चेअरमन सवजीभाई ढोलकिया यांना इतक्या असुविधांमध्ये लोक खरच जगू शकतात का? हा प्रश्न पडला. 
- परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते सुरत येथून सहकाऱ्यांसह पाठवले. डोंगरदऱ्यात तीन किलोमीटर पायी चालत गावात पोहाेचले. 
- गावातील प्रत्येक नागरिकाला ब्लँकेट, चादर, साडी व लहान मुलांना खाऊचे वाटप केले. गावातील चारही पाड्यांना भेट देत भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली. 
- शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली.

- शिक्षकांच्या मागणीनुसार शाळेला सौरऊर्जा संच, डिजिटल वर्ग करून देण्यासह शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन दिले.

 

गावाला सर्व प्रकारची करणार मदत-

 

- गावातील अंधार दूर करण्यासाठी चारही पाड्यांवर सोलर पथदिवे बसवले जातील, असे सांगितले.

- त्याच बरोबरच गावातील तीस तरुणांना सुरत येथे निवासी व्यवस्थेसह चांगल्या कंपनीत नोकरी देण्याचा शब्द दिला. 
- गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नर्मदा नदीतून जलवाहिनी टाकण्यासाठी येणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी सवजीभाई डोलकिया यांनी दर्शवली. 
- गावातील शेतकऱ्यांच्या मशागतीसाठी बैलजोडी देणे, प्राथमिक आरोग्य केंद्राला आराेग्य किट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
- आदिवासींनी उत्पादित केलेल्या मालाला मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतील, असेही सांगितले.


‘दिव्य मराठी’चे आभार-

 

- ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताने आमच्या दुर्लक्षित गावात देवदूत अवतरला. आदिवासींच्या मरणयातना जाणून घेत सवजीभाई डोलकिया यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. 
- सरकार जे काम करू शकले नाही ते काम ‘दिव्य मराठी’च्या एका बातमीमुळे झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ वसंत पावरा यांनी व्यक्त केली.

 

कोण आहेत ढोलकिया-

 

- सवजीभाई धनजी ढोलकियासुरत येथील पाचवी नापास असलेले जगप्रसिद्ध हिरे व्यापारी आहे. 

- त्यांनी १२ रुपयांपासून केली व्यवसायाची सुरुवात. आता सहा हजार काेटींचे मालक आहेत. 
- ते सन १९७७मध्ये साडेबारा रुपये घेऊन सुरतला अाले. १० वर्षे हिरे घासण्याचे काम केले. 
- त्यानंतर हरिकृष्ण कंपनी सुरू केली. दिवाळीत १२०० कर्मचाऱ्यांना कार, बंगला व दागिने गिफ्ट म्हणून दिले. 
- स्वतःच्या मुलांना फक्त भाड्याचे पैसे देऊन संघर्षपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांनी पाठवले.


आदिवासींसोबत गायले भजन-

 

- तिनसमाळ गावात मित्रांसोबत सवजीभाई जंगलात झोपले. रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या खाटेजवळ सर्प निघाला, परंतु अचानक ग्रामस्थांचे लक्ष गेले. त्यामुळे अनर्थ टळला. त्यांनी आदिवासींसोबत रामधून व भजन गायले.

 

गाव पाहून वाईट वाटले- ढोलकिया

 

- हरिकृष्ण एक्स्पोर्ट्सचे चेअरमनसवजीभाई ढोलकिया म्हणाले, भास्कर समूहाच्या दिव्य मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीतून मला तिनसमाळची परिस्थिती समजली. 
- मला प्रश्न पडला की आधुनिक भारतात खरच असे गाव आहे का? त्यामुळे खात्री करण्यासाठी गावात आलो. 
- आदिवासी समाजाची बिकट परिस्थिती पाहून वाईट वाटले. ग्रामस्थांना भविष्यात अाणखी भरीव मदत करेन. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, दानशूर सावजीभाई ढोलकिया यांचे आदिवासी पाड्यावर पोहचतानाचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...