आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेते दिलीप कुमार यांचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बिल्डरच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या बिल्डरने दिलीप कुमार यांचा वांद्र्यातील बंगला बळकावण्याचा प्रयत्न केला होता. या दोन भूखंडांवर हा बंगला तयार करण्यात आला आहे, त्यावर बिल्डर समीर भोजवानी यांनी त्यांचा असल्याचा खोटा दावा केला होता. वांद्र्यातील पाली हिल परिसरात हा बंगला आहे. 


बंगला बळकावण्यासाठी भोजवानीने काही बनावट कागदपत्रे तयार केली असावी असा संशय पोलिसांना आहे. पोलिस उपायुक्त पराग मानेरे म्हणाले की, दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी पोलिसांत भोजवानीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. दिलीप कुमाप यांनी हे दोन्ही भूखंड 1953 मध्ये 1.40 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण भोजवानी यांनी दावा केला की, त्यांच्या वडिलांनी 1980 मध्ये ही संपत्ती मूलराज खताऊ न्यास यांच्याकडून खरेदी केली होती. 


बिल्डर भोजवानी सध्या फरार असल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने भोजवानीच्या वांद्र्यातील घरावर छापा मारला. त्यावेळी त्याठिकाणाहून चाकू, सुऱ्यांसह अनेक शस्त्रे जप्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...