आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात मृत्यूच्या जाळ्यात ओढले गेले आई-मुलगा, समोर आला व्हिडीओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये असणाऱ्या जागेत हे दोघे अडकले होते. - Divya Marathi
फ्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये असणाऱ्या जागेत हे दोघे अडकले होते.

मुंबई- पश्चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री एका आरपीएफ कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा आणि तिच्या सात वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. दोघेही धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधल्या गॅपमध्ये आले होते. या घटनेनंतर रविवारी आरपीएफने कॉन्स्टेबलचा सत्कार केला.

 

 

समोर आला या घटनेचा व्हिडीओ
- या घटनेचा व्हिडीओ जारी करत आरपीएफने म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री नऊ वाजता नायगांव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर एक महिला आणि तिचा 7 वर्षांचा मुलगा वेगात लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. 
- या दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मध्ये असणाऱ्या गॅपमध्ये ओढले जाऊ लागले. यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या आरपीएफच्या सुनील कुमार नापा या जवानाने तत्परता दाखवत या माय-लेकांना वाचवले.
- तिथे असणारे अन्य नागरिकही यावेळी मदतीसाठी धावले. रेल्वे प्रशासनाने सुनील कुमार नापा यांच्या कामाची दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र दिले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...