आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगाब्लॉक: लोकलसेवा पूर्णपणे बंद, सह्याद्री, सेवाग्राम, पंचवटी, सिंहगड, डेक्कन क्वीन रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परळ आणि करीरोड येथे लष्कराकडून पादचारी पूल उभारण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते दादर दरम्यान रविवारी विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून हा मेगा ब्लॉक सुरु झाला आहे.

 

 

या मार्गावरील लोकलसेवा होणार विस्कळीत

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे मार्गावरील परळ करी रोड आणि एल्फिन्स्टन स्टेशनवर नवीन पादचारी पूल बांधण्याचे काम लष्कराकडून युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचसाठी परळ आणि करीरोड येथे पूल उभारण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आहे.

सकाळी 8.30 वाजल्यापासून पादचारी पूल उभारण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे सीएसएमटी ते दादर स्थानकादरम्यानची जलद आणि धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे बंद आहे. दादरपासूनच पुढे कल्याण, कर्जत, कसारासाठी लोकल गाड्या चालविण्यात येतील.

 

 

या एक्स्प्रेस गाड्या रद्द

या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईहून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस आणि मुंबईहून नागपूरला जाणारी सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय, सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि पंचवटी एक्स्प्रेस या गाड्या ही रद्द करण्यात आल्या आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...