आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांनी ठरवले तरच भुजबळ सुटतील- राज ठाकरेंचा टाेला,‘भुजबळ जोडो नव्हे तर छोडो’ अभियान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी मंत्री छगन भुजबळांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ उपक्रमांतर्गत सोमवारी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर औपचारिक चर्चा झाल्यानंतर निवडक भुजबळ समर्थकांशी ‘खास’ चर्चा करतेवेळी राज यांनी आपल्या शैलीत शब्दांचे अनेक फटकारे लावल्याचे समजते. या भेटीतील ‘ऑन द रेकॉर्ड’ आणि ‘ऑफ द रेकॉर्ड ’ झालेल्या चर्चेचा वृत्तांत.  

 

> ऑन द रेकॉर्ड - ‘माजी मंत्री छगन भुजबळांचे प्रकरण हे आर्थिक बाबींशी संबंधित आहे. सर्व मालमत्ता जप्त केल्यानंतर खरे तर भुजबळांना जामीन मिळायला हवा होता. मात्र सध्या देशभर सुडाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे अजून वर्ष- सहा महिने काढा,’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भुजबळ समर्थकांना दिलासा दिला. भुजबळ जोडो अभियानाऐवजी तुमच्या अभियानाचे नाव भुजबळ छोडो अभियान असे असायला हवे होते, असे ते म्हणाले. सोमवारी सकाळी अकरा वाजता नाशिकमधील काही भुजबaळ समर्थकांनी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली, या वेळी ते बाेलत हाेते.   


माजी मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर हे गेल्या दाेन वर्षांपासून तुरुंगात अाहेत. त्यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी राज्यभर अांदाेलन छेडले अाहे. काही समर्थकांनी साेमवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. या वेळी राज ठाकरे म्हणाले की, ‘भुजबळांच्या अटकेबाबत राजकारण सुरू आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर आपण कुणीही भाष्य करू शकत नाही. हे प्रकरण आर्थिक विषयाशी संबंधित आहे. शिवाय या प्रकरणाशी संबंधित सगळ्या मालमत्ता जप्त केल्या असतील तर जामीन मिळण्यात अडचण नाही. आणि तपास यंत्रणेला काही चौकशी करायची असेल तर त्यासाठी त्यांच्या कस्टडीची गरज नाही,’ असे ते म्हणाले.  तसेच भुजबळांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही राज यांनी मार्मिक भाष्य केले.   


या वेळी भुजबळ समर्थक माजी खासदार देविदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार शिरीष कोनवाळ,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे, जि.प.अध्यक्ष मायावती पगारे  अादी उपस्थित हाेते. भुजबळांच्या सुटकेसाठी अापण सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार असल्याचे अामदार जाधव यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बाेलताना सांगितले.

 

> ऑफ द रेकॉर्ड- ‘माजी मंत्री छगन भुजबळ  यांच्यावर भाजपकडून अन्यायकारकरीत्या कारवाई हाेत असेल तर माझ्यापेक्षा शरद पवार हेच अधिक मदत करू शकतात. कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र माेदी हेच पवारांचे बाेट धरून राजकारणात अाल्याचा दावा करीत असल्यामुळे त्यांना अशक्य ते काय?’ अशी गुगली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाकली. पवारांनी ठरवले तरच भुजबळ तुरुंगाबाहेर पडतील असा धक्कादायक दावाही भुजबळ समर्थक भेटीनंतर त्यातील निवडक पदाधिकाऱ्यांशी बाेलताना राज यांनी केला. याप्रसंगी माध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर ठेवण्यात आले होते.   


भेटीप्रसंगी राज यांनी प्रथम निवडक पदाधिकाऱ्यांकडून नेमके म्हणणे जाणून घेतले. मात्र, अभियानात कशा पद्धतीने बदल करावे याबाबत सूचनाही केल्या. विधिमंडळावर मार्च महिन्यात माेर्चा काढण्यापूर्वी ‘अन्याय पे चर्चा’ अाणि ‘भुजबळ समर्थक जाेडाे’ अभियान राबवले जात असल्याचे ठाकरे यांना सांगताच त्यांनी ‘जाेडाे काय, भुजबळ छाेडाे’ अभियान राबवा, असा टोला लगावला. माजी आमदार शिरीष काेतवाल यांनी एकतर्फी कारवाई हाेत असल्याचे सांगितल्यानंतर राज यांनी एकतर्फी कशी, असा प्रश्न करत ‘भुजबळ काका-पुतण्यांकडून कशा चुका झाल्या’ त्याचा पाढाच वाचल्याचे समजते. 


प्रकरण काेर्टात, मी काय करणार
समीर यांचे नाव न घेता भुजबळ यांना वैयक्तिकरीत्या झालेल्या भेटीत काही गंभीर मुद्द्यांबाबत लक्ष घालणे कसे गरजेचे हेही आपण सांगितले हाेते, असेही राज म्हटल्याचे कळते. भुजबळ यांच्या सुटकेची बाब पूर्णत: न्यायप्रविष्ट असून त्यात मी काय मदत करू शकताे ? मुळात माझ्याकडे येण्यापेक्षा तुम्ही पवारांना भेटणे गरजेचे अाहे. जर भुजबळ यांच्यावरील कारवाईसाठी भाजप जबाबदार असेल तर याच पक्षाचे सर्वेसर्वा नरेंद्र माेदी हे पवार यांनाच राजकीय गुरू मानतात हे जगजाहीर अाहे. कृषी व्यवस्था संकटात अाली, साखरेचे भाव काेसळले तर याच शरद पवारांची भाजप मदत घेतो. त्यामुळे पवार यांनी ठरवले तर भुजबळ लवकर बाहेर पडू शकतात, असेही राज यांनी सुनावल्याचे कळते. राज यांच्या या पवित्र्याने उपस्थित निवडक भुजबळ समर्थकांची भंबेरी उडाली आणि अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, अशी चर्चा राष्ट्रवादीच्याच स्थानिक वर्तुळात रंगली होती.   

 

चर्चेत रंगले समीर भुजबळ यांचे ‘हवाई पान’
निवडक पदाधिकाऱ्यांशी बाेलताना राज ठाकरे यांनी माजी खासदार समीर भुजबळांबाबतच्या सुरस किश्श्यांचा संदर्भ दिला. जुहूचे स्पेशल पान  हेलिकॉप्टरने नाशिकला घेऊन जाण्यासाठी सत्ता राबवली जात असेल तर असे हाेणारच, असेही सुनावल्याचे समजते. समीर यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडत सत्ता राबवताना भुजबळ यांच्याकडून कळत नकळत ज्या चूका घडल्या  त्याकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचेही राज म्हणाले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...