आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ व माझे दु:ख सारखेच, न्याय मिळत नसतो- खडसेंचा पक्षाला पुन्हा घरचा आहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भाजपतून सध्या अडगळीत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा त्यांची खदखद बाहेर काढली आहे. भुजबळ समर्थकांच्या भेटीत एखाद्या व्यक्तीविषयी जाणीवपूर्वक काही ठरविले जात असेल तर त्याला न्याय मिळत नसतो. दाेन वर्षांनी भुजबळ हे निर्दाेष सिद्ध झाले तर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भाेगली त्याची भरपाई काेण करणार, असा सवाल खडसेंनी केला. भुजबळ आणि आपली स्थिती सारखीच असल्याचेही ते म्हणाले. 


माजी मंत्री छगन भुजबळ हे २२ महिन्यापासून तुरूंगात अाहेत. भाजपाकडून तपास यंत्रणेवर दबाव असल्यामुळेच भुजबळ यांची सुटका हाेत नसल्याचा समर्थकांचा अाराेप अाहे. या कथित अन्यायावर चर्चा करून समर्थन मिळण्याच्या मागणीसाठी समर्थकांनी सध्या राज्यभरातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या अाहेत. साेमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठाेपाठ मंगळवारी त्यांनी खडसेंची भेट घेतली. 


भुजबळ प्रकरणात कशापद्धतीने अन्याय हाेत अाहे याबाबत समर्थकांनी खडसेंकडे व्यथा मांडली. त्यानंतर समदुखी असलेल्या खडसे यांनी सत्ताधारी भाजपला अप्रत्यक्ष चिमटा काढला. जाणीवपूर्वक काही ठरवले जात असेल तर न्याय मिळत नाही, अशी खंत व्यक्त करीत केवळ भुजबळच नाही तर अापलीही अापबीती अधाेरेखित केली.  अाराेप हाेत असतात व कालांतराने त्यातून निर्दाषत्वही मिळते मात्र न केलेल्या गुन्ह्याची जी शिक्षा भाेगली जाते त्याची भरपाई काेण करणार असा सवालही त्यांनी केला. भुजबळ समर्थकांनी सुरु केलेल्या “अन्याय पे चर्चे’ला नक्कीच न्याय मिळेल असाही अाशावाद त्यांनी व्यक्त केला.  या वेळी बापू भुजबळ, आमदार जयवंत  जाधव, समता परिषदेचे दिलीप खैरे उपस्थित हाेते.

 

जयंत पाटलांचीही भेट-

 
भुजबळ समर्थकांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांची भेट घेतली. भुजबळ यांच्या सोबत असून मुंबईत होणाऱ्या आंदोलनास सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिल्याचेही समर्थकांनी स्पष्ट केले.

 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...