आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या यजमानपदाखाली यूथ ऑलिम्पिक २०२६ आणि ऑलिम्पिक २०३२ या खेळाच्या आयोजनाची इच्छा व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी शुक्रवारी मुंबईचा दौरा केला. येथे सुरू असलेल्या क्रीडा क्षेत्राची माहिती घेतली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यूथ आणि वरिष्ठ खेळांचे मुंबईत आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली.
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयअोए) अध्यक्ष नरेंद्र बत्रांकडून मुंबईला मोठे समर्थन मिळते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) पहिल्या महिला भारतीय सदस्य नीता अंबानी यांनीदेखील फडणवीसांचे समर्थन केले आहे. बाक यांनी मुंबई दौऱ्यात फडणवीस, अंबानी आणि बत्रांसह माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर व इतर भारतीय खेळाडूंची भेट घेतली. त्यांनी रिलायन्स फाउंडेशनअंतर्गत मुलांसाठी स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती घेतली. त्यांनी मुलांचा ५ साइड फुटबॉल सामना व बास्केटबॉलचे प्रशिक्षण पाहिले. ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रानेदेखील यूथ ऑलिम्पिकच्या यजमानपदाचे समर्थन केले. आपण विविध खेळांच्या आयोजनाचा विचार केल्यास त्यासाठी यूथ ऑलिम्पिक सर्वात चांगला पर्याय ठरेल,असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.