आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत मतदानादरम्यान भाजप- शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा; पोलिसांचा लाठीमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. - Divya Marathi
भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली.

मुंबई- भिवंडीत बुधवारी जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. दोन्ही बाजुंनी एकमेंकावर जोरदार हल्ले केल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला.

 

कसा सुरु झाला वाद
- बुधवारी ठाणे आणि भिवंडी येथील जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समित्या आणि 10 नगरपरिषदा आणि पंचायतीसाठी मतदान होत आहे. 

- भिवंडीतील कालेर येथे आज मतदान होत आहे याच दरम्यान मतदानाच्या रांगेवरुन भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

- हा वाद इतका वाढला की प्रकरण मारामारीपर्यंत पोहचले. या मारामारीमुळे मतदान प्रक्रियाही थांबवावी लागली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि तरीही स्थिती नियंत्रणात येत नसल्याने लाठीमार करण्यात आला. 

- स्थिती तणावपूर्ण असून पोलिसांचे अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. निवडणुक आयोगानेही याबाबतची माहिती मागवली आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...