आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारसाहेब, देशाचे राजकारण करा, द्वेषाचे नको- मुख्यमंत्री फडणवीसांचे विदेशातून प्रत्त्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी व फडणवीस यांना नक्षलवाद्यांकडून धमक्यांची पत्रे आल्याचा प्रकार खोटा असल्याचा आरोप पवारांनी केला केला होता. - Divya Marathi
मोदी व फडणवीस यांना नक्षलवाद्यांकडून धमक्यांची पत्रे आल्याचा प्रकार खोटा असल्याचा आरोप पवारांनी केला केला होता.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान हे पक्षाचे नाही, तर देशाचे नेते असतात. पवारसाहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही! पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत. सत्य बाहेर येईलच, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे फडणवीस सध्या कॅनडात असून, तेथूनच त्यांनी हे टि्वट केले आहे. 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पवारांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १०) पुण्यात झाला. त्या वेळी ते बोलताना पवारांनी नक्षलवाद्यांकडून धमक्यांची पत्रे आल्याचा प्रकार खोटा असल्याचाही आरोप केला होता. तसेच छगन भुजबळांना डांबून ठेवले. माजी अर्थमंत्री राहिलेल्या पी. चिदंबरम यांना अटकेत टाकण्याची तयारी चालू आहे. भीमा कोरेगावचा उद्योग कोणी केला हे सगळ्या दुनियेला माहिती असताना एल्गार परिषदेवरून अटक केली जात आहे. या सगळ्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. यानंतर कॅनडा देशाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांनी पवार यांच्या आरोपांना तत्काळ टि्वटद्वारे उत्तर दिले. 

 

मुख्यमंत्र्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, ''मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही! पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य बाहेर येईलच.''

बातम्या आणखी आहेत...