आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस आता यामुळे आहे चर्चेत, चालवली ठाकरे घराण्यांची परंपरा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजस ठाकरे (डावीकडे) भाऊ आदित्य व पिता उद्धव समवेत.... - Divya Marathi
तेजस ठाकरे (डावीकडे) भाऊ आदित्य व पिता उद्धव समवेत....

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे द्वितीय पुत्र तेजस ठाकरे यांना संशोधनासासाठी खेकडे गोळा करण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तेजस यांना ही परवानगी देण्यात आली. तेजस यांनी खेकड्याच्या काही प्रजाती शोधून काढल्या आहेत. यापैकी एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचे नाव देण्यात आले आहे. 'गुबेरनॅटोरिआना ठाकरी' आणि इतर चार प्रजाती त्याने सावंतवाडीजवळ शोधल्या आहेत. तेजसने लाल-जांभळट कवच आणि केशरी रंगाची नांगी असलेल्या खेकड्याच्या प्रजाती शोधल्या आहेत. 

 

2016 मध्ये शोधल्या होत्या खेकड्यांच्या पाच नव्या प्रजाती-

 

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस यांनी खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. 
- त्यातील एका प्रजातीला झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने ‘गुबेरनॅटोरिआना ठाकरी’ असे नाव दिले आहे. 
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये गोड्या पाण्यात हे खेकडे आढळतात.
- उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा असलेल्या 21 वर्षीय तेजसने कला शाखेत पदवी घेतली आहे.
- जंगल, झाडे आणि वन्य प्राण्यांचा अभ्यास करणे हा त्याचा छंद आहे. 2015 मध्ये तेजस काही विद्यार्थी व तज्ञ मंडळीसोबत कोकणात गेला होता.
- कोकणातील सह्याद्री पर्वत रांगेतील वेस्टर्न घाटात अनेक वन्य-जीव प्राण्यांचा रहिवास, अधिवास आहे.
- सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरातील एका गोड्या पाण्याच्या धबधब्यात तेजसच्या टीमला काही वेगळे खेकडे दिसले. हे खेकडे लाल-जांभळट कवच असलेले व केशरी रंगाची नांगी असलेले दिसले.
- तेजसच्या टीमने हे खेकडे त्यांच्यासमवेत असलेल्या तज्ञांना दाखवले. यानंतर अशा प्रकारचे खेकडे प्रथमच आढळून आल्याचे दिसले.
- डॉ. एस. के. पाटील आणि अनिल खरे यांनी याबाबत रिसर्च पेपर लिहण्यास तेजसला मदत केली.
- त्यानंतर वेगवेगळ्या शोधांशी संबंधित माहिती सायंन्टिफिक रिसर्च पेपर 'इंटकनॅशनल जर्नल जूटाक्सा'मध्ये पब्लिश करण्यात आला. यानंतर याला वैज्ञानिक मान्यता मिळाली.

 

असे ठेवले ‘ठाकरी’ खेकडा नाव?

 

- तेजस ठाकरे यांनी शोधलेल्या खेकड्यांच्या पाच प्रजातींना घातिमा अ‍ॅट्रोपर्पुरेआ, घातिआना, स्प्लेन्डिडा, गुबेरनॅटोरिआना कल्कोकी, गुबेरनॅटोरियआना वाघी आणि गुबेरनॅटोरिआना ठाकरी अशी नावे ‘झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने दिली आहेत. 
- तेजसने शोधलेल्या खेकड्याचे नाव गुबरनाटोरेनिया रूबरा असे ठेवावे असे सजेस्ट केले होते. लॅटिन भाषेत रूबरा याचा अर्थ लाल रंग असा होतो.
- मात्र, डॉ. पाटील यांनी या खेकड्याचे नाव 'गुबरनाटोरेनिया ठाकरी' असे ठेवले. उर्वरित चार खेकड्यांची नावे घातिमा अॅट्रोपर्पुरेआ, घातिआना स्प्लेन्डिडा, गुबेरनॅटोरिआना अल्कोकी आणि गुबेरनाटोरेनिया वाघी अशी नावं ठेवण्यात आली आहेत.

 

तेजसचा सापांचाही अभ्यास, आता रानमांजरांच्या मागावर-

 

- तेजस ठाकरे जुलै 2015 मध्ये या कामाला गती दिली. कोकणात प्रजाती शोधण्यासाठी गेल्यानंतर तो तेथे तीन महिने राहिला. यादरम्यान जंगलात विषारी सापांसमवेत तीन महिन्यांचा काळ घालवला.
- तेजस ठाकरे हे सध्या पश्चिम महाराष्ट्रातील घाटांमध्ये भ्रमंती करत आहेत. पावसाळ्यात शोध घेण्यास सोपे जाते. घाटातील रानमांजराचा शोध घेत त्यांचे छायाचित्रण करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

 

ठाकरे घराण्याला एक परंपरा-

 

- प्रबोधनकारांचे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे घराणे म्हणजे अजब रसायन. 
- त्या घराण्याला कलेची, प्रतिभेची आणि नेतृत्वगुणांची देणच लाभलेली असून तो वारसा पुढच्या पिढ्यांमध्येही स्वाभाविकपणे उतरला आहे. 
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अप्रतिम फोटोग्राफीने सगळ्यांनाच चकित करून टाकले.
- तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या काव्य प्रतिभेची ‘चमक’ बालवयातच दिसलेली आहे.
- त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनीही एका ध्यासातून जंगल, झाडे आणि वन्य प्राण्यांचा अभ्यास करण्याचा छंद जोपासला आहे. यातूनच त्यांनी खेकड्यांच्या पाच नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. 
- तेजस यांच्या या संशोधनाला ‘टॅक्सोनॉमी’ (झाडे आणि प्राण्यांचे शास्त्रीय वर्गीकरण)च्या क्षेत्रात रितसर मान्यता देण्यात आली आहे. 
- त्यांचा खेकड्यांच्या नव्या पाच प्रजातींवरचा शोधनिबंध ‘झुटॅक्सा’ या टॅक्सोनॉमिस्टांच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...