आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Adult चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या मनोहर पर्रीकर यांच्यासोबत घडते असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या बालदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या तारुण्यात काळातील काही आठवणीही सांगितल्या. त्यांनी सांगितले की, तु्म्ही आता जे काय टीव्हीवर पाहता तेच आमच्यासाठी त्या काळात अॅडल्ट होते.

 

एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या तारुण्यात कशा पध्दतीचे चित्रपट पाहायचा? या प्रश्नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, त्या काळात एक अॅडल्ट चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. मी आणि माझा भाऊ तो चित्रपट पाहण्यास गेले. मध्यांतरादरम्यान वीज गेली. तेव्हा आमच्या लक्षात आले की आपले शेजारी राहणारे काकाच आपल्या शेजारी बसले आहेत. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो आम्हाला खात्री होती की ते ही बाब घरी सांगतील.

 

मी आणि माझा भाऊ हा चित्रपट अर्धवट सोडून बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही घरी काय सांगायचे यावर विचार केला आणि तसे करायचे ठरवले. घरी पोहचल्यावर आम्ही आईला सांगितले की आम्ही चित्रपट पाहण्यास गेलो होतो. आम्हाला माहित नव्हते की तो चित्रपट अश्लील आहे. आम्हाला हे लक्षात येताच आम्ही चित्रपट अर्धवट सोडून घरी आलो. त्यानंतर आम्ही आपले शेजारी राहणारे काकाही तिथे होते हे सुध्दा सांगितले.

 

पुढे काय घडले हे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...