आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले- भय्यूजी महाराज यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- श्री भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री भय्यूजी महाराज यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे. विशेषतः जलसंधारण, भूमी सुधारणा, शिक्षण क्षेत्रासह सामुहिक विवाह चळवळीतही त्यांनी लक्षणीय काम केले होते. विशेषतः महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हजारो हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे. त्यांच्या निधनाने समाजाला विधायक कामासाठी उद्युक्त करणारे प्रेरणास्रोत हरपले आहे. 

बातम्या आणखी आहेत...